ढगाळ वातावरणाने रब्बी हंगाम धोक्यात
By Admin | Updated: November 24, 2015 01:04 IST2015-11-24T01:04:47+5:302015-11-24T01:04:47+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात बदललेल्या ढगाळ वातावरणाने रब्बी हंगाम धोक्यात आला आहे.

ढगाळ वातावरणाने रब्बी हंगाम धोक्यात
नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात बदललेल्या ढगाळ वातावरणाने रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. हे वातावरण आणखी लांबल्यास शेतात उभ्या असलेल्या पिकांचे आणखी नुकसान होऊ शकते. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे मिरची उत्पादक शेतक:यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. हे वातावरण पिकांना मारकही ठरू लागले आहे. त्यात सप्टेंबरअखेर हरभ:याची पेरणी झाली आहे. या हरभ:यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसेच तूर पीक फुले व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. या तूर पिकावरही घाटे अळी व शेंगा पोखरणा:या अळीचा दणका बसू शकतो. याशिवाय शेतात मिरची उभी आहे. असे ढगाळ वातावरण अजून काही दिवस राहिल्यास मिरची पिकावर भुरी रोग उद्भवू शकतो. वेलवर्गीय पिकांमध्ये (उदा. कारले, गिलके, दोडके आदी) केवडा, करपा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. विविध रोगांपासून बचाव होण्यासाठी पिकांवर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पेरणी करावी, असे सांगण्यात आले. गहू गेल्या 10 नोव्हेंबरपासून पेरण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे गहू पिकावर रोग उद्भवण्याची शक्यता कमी आहे. मिरची पडते काळी ढगाळ वातावरण शेतक:यांप्रमाणेच मिरची व्यापा:यांसाठीही नुकसानदायी ठरत आहे. अशा वातावरणात पथा:यांवरील 34 ते 40 टक्के मिरची काळी पडते. गेल्या दोन दिवसांपासून मिरची वाळवण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. मिरचीला आतून बुरशी लागते आणि बाहेरून मात्र लाल दिसते. आजच्या स्थितीत शहरात भालेर रस्त्यावर 25 पथा:यांवर तेवढय़ाच व्यापा:यांच्या मिरच्या वाळवण्यासाठी टाकण्यात आल्या आहेत. मिरची एकदा तोडल्यानंतर पथा:यांवर टाकण्याशिवाय पर्याय नसतो. बदललेले वातावरण, दोन दिवसात झालेला पावसाचा शिडकावा यामुळे मिरची व्यापारी हतबल झाले आहेत.