आर. आर. विद्यालयात शहीद जवानांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:18 IST2021-07-28T04:18:10+5:302021-07-28T04:18:10+5:30
प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूल प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मुख्याध्यापिका श्रद्धा दुनाखे, विजया चावरे व सुषमा थोरात यांच्या हस्ते ...

आर. आर. विद्यालयात शहीद जवानांना अभिवादन
प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूल
प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मुख्याध्यापिका श्रद्धा दुनाखे, विजया चावरे व सुषमा थोरात यांच्या हस्ते कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शिक्षिका सारिका पाटील व दीपाली वैद्य यांनी ऑनलाईन द्वारे विद्यार्थांना डॉ. कलाम यांच्याबद्दल माहिती सांगितली. यशस्वीतेसाठी चेअरमन प्रेमचंद ओस्वाल, संस्थाध्यक्षा मंगला दुनाखे, सचिन दुनाखे यांचे मार्गदर्शन लाभले.
अत्रे विद्यालयाचा वर्धापन दिन साजरा
शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै. सौ. सुशीलाबाई वामनराव अत्रे प्राथमिक विद्यालयाचा वर्धापन दिन संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुशील अत्रे, चिटणीस अभिजित देशपांडे, सदस्य पारसमल कांकरिया, प्रतिभा देशकर, समन्वयिका रजनी पाठक, मुख्याध्यापिका उषा बाविस्कर, साधना महाजन, रेखा चंद्रात्रे, स्वाती नेवे, दुर्गादास मोरे, प्रीती झारे यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खाऊ व गोष्टींची पुस्तके वाटप करण्यात आली. यावेळी अक्षय वर्मा या विद्यार्थ्यानेही मनोगत व्यक्त केले. आभार भाग्यश्री कुलकर्णी यांनी मानले.