हॉकर्सच्या प्रश्नी कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:01 IST2021-02-05T06:01:39+5:302021-02-05T06:01:39+5:30

अजय पाटील शहरातील फुले मार्केटमधील हॉकर्सचा प्रश्न आता गंभीर होत जात आहे. दररोज मनपाच्या पथकाकडून कारवाई केली जाते, तरीही ...

The question of hawkers needs to be settled permanently | हॉकर्सच्या प्रश्नी कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरज

हॉकर्सच्या प्रश्नी कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरज

अजय पाटील

शहरातील फुले मार्केटमधील हॉकर्सचा प्रश्न आता गंभीर होत जात आहे. दररोज मनपाच्या पथकाकडून कारवाई केली जाते, तरीही ही समस्या आता मार्गी लागू शकत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दररोजची कारवाई, धावपळ आणि वाद अशी परिस्थिती आता फुले मार्केटमध्ये दररोजच असते. यावर तोडगा काढण्यासाठी मनपाने साने गुरुजी रुग्णालयाची जागा हॉकर्सला व्यवसाय करण्यासाठी दिली आहे. मात्र, हॉकर्सचा या जागेला नकार असून, जुन्या नगरपालिकेच्या जागेसाठी हॉकर्स आग्रही आहेत. मात्र, मनपा ती जागा द्यायला तयार नाही. दरम्यान, जर हॉकर्सचा प्रश्न या मागणीने सुटणार असेल तर मनपा प्रशासनाने देखील काही जागांबाबत आडमुठेपणा सोडण्याची गरज आहे. विशेष म्हणजे कॉग्रेसचे सरचिटणीस विष्णू घोडेस्वार यांनी २०१७ मध्ये जुन्या नगरपालिकेची जागा हॉकर्सला व्यवसाय करण्यासाठी मिळावी म्हणून उपोषण केले होते. या उपोषणाची दखल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. तसेच ही जागा हॉकर्सला देण्याचे आदेश देखील मनपाला दिले होते. मात्र, मनपाने ही जागा पे ॲण्ड पार्किंगसाठी दिली आहे. त्यामुळे मनपा ही जागा हॉकर्सला द्यायला तयार नाही. फुले मार्केटमधील अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर आहे. त्याठिकाणी आधीच गर्दी असते त्यात अतिक्रमणामुळे अनेक छेडखाणीच्या घटना देखील होत असतात. त्यामुळे हॉकर्सला याठिकाणी व्यवसाय करू न देणे योग्यच आहे. मात्र, हॉकर्सच्या पोटपाण्याचा विषय असल्याने त्यांना ज्या ठिकाणी व्यवसाय करणे सोईचे ठरु शकते अशा काही जागा मनपाने उपलब्ध करून देणे देखील गरजेचे आहे, अन्यथा प्रशासन व हॉकर्स असा संघर्ष निर्माण होवू शकतो. यासह हॉकर्सने देखील मनपाने सुचविलेल्या पर्यांयावरर देखील विचार करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे हॉकर्स प्रश्नी लोकप्रतिनिधी लक्षच घालायला तयार नाहीत. गाळेप्रश्नी जे लोकप्रतिनिधी बैठकांवर बैठका घेतात ते प्रतिनिधी हॉकर्सच्या प्रश्नावर मागे का सरकतात हा प्रश्न देखील महत्वाचा आहे. त्यामुळे हॉकर्सप्रश्नी समन्वयाने निर्णय घेण्याची गरज असून, त्यात हॉकर्स व प्रशासनाने देखील आडमुठेपणाची भूमिका सोडण्याची गरज आहे.

Web Title: The question of hawkers needs to be settled permanently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.