प्रा. गिरीश पाटील जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:16 IST2021-09-03T04:16:46+5:302021-09-03T04:16:46+5:30
यावेळी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, विद्यापीठाचे व्यवस्थापक समिती सदस्य व माजी महापौर विष्णू भंगाळे, क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, ...

प्रा. गिरीश पाटील जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित
यावेळी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, विद्यापीठाचे व्यवस्थापक समिती सदस्य व माजी महापौर विष्णू भंगाळे, क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते क्रीडाशिक्षक प्रा. गिरीश पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
प्रा.गिरीश पाटील पाचोरा येथील एम.एम. महाविद्यालयात क्रीडा शिक्षक व तालुका क्रीडा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ, संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हा. चेअरमन व्ही. टी. जोशी, कनिष्ठ महाविद्यालय समितीचे चेअरमन सुरेश देवरे संचालक डॉ. जयंत पाटील, प्राचार्य वासुदेव वले, उपप्राचार्य जी. बी. पाटील, पर्यवेक्षक एस. एम. पाटील यांनी अभिनंदन केले.
020921\02jal_3_02092021_12.jpg
प्रा. गिरीष पाटील जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित