अभविपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. मनीष जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:17 IST2021-02-11T04:17:52+5:302021-02-11T04:17:52+5:30

चिंचोली येथे ४० दिवसांपासून डीपी नादुरुस्त जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथे ४० दिवसांपासून डीपी नादुरुस्त असल्यामुळे नागरिकांना अंधारात रहावे ...

Pvt. Dr. Manish Joshi | अभविपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. मनीष जोशी

अभविपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. मनीष जोशी

चिंचोली येथे ४० दिवसांपासून डीपी नादुरुस्त

जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथे ४० दिवसांपासून डीपी नादुरुस्त असल्यामुळे नागरिकांना अंधारात रहावे लागत आहे. याबाबत बुधवारी गावातील नागरिकांनी महावितरणचे शहराचे प्रभारी कार्यकारी अभियंता एन. बी. चौधरी यांना तातडीने डीपी दुरुस्त करण्याबाबत निवेदन दिले. तसेच लवकरात लवकर डीपी दुरुस्त न झाल्यास आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. भाजपचे तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी अरुण सपकाळे, संदीप पाटील, विलास घुगे, सागर घुगे, सुनील लाड, मीनल लाड, सुभाष पवार, सुधाकर ढाकणे, आनंद घुगे, वैभव वाघ, दीपक पवार, मयूर पाटील आदी नागरिक उपस्थित होते.

भाजपातर्फे आज पंडित दीनदयाल उपाध्या यांना अभिवादन

जळगाव : पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त ११ फेब्रुवारी रोजी भाजपा जिल्हा महानगरातर्फे सुभाष चौक येथे त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता भाजपाच्या बळीराम पेठेतील कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी केले आहे

Web Title: Pvt. Dr. Manish Joshi