शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

चाळीसगाव येथे भरड धान्य खरेदी काटापूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 1:50 PM

भरडधान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ व काटापूजन झाले.

ठळक मुद्देचाळीसगावच्या शेतकरी संघाला मिळाले त्यांच्याच गैरकारभाराचे फळ : आमदार मंगेश चव्हाण आमदार मंगेश चव्हाण यांची संघर्षाची भूमिकाभरडधान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ व काटापूजन

चाळीसगाव : व्यापाऱ्यांचे कल्याण करुन शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या शेतकरी सहकारी संघाला त्यांनीच केलेल्या गैरकारभाराचे फळ मिळाले आहे. यापुढेही शेतकऱ्यांसाठी संघर्षाची भूमिका कायम असेल. तालुक्यात भ्रष्ट प्रवृत्तीला कदापि खपवून घेणार नाही, असा सूचक इशाराच आमदार मंगेश चव्हाण यांनी येथे दिला. शनिवारी त्यांच्या हस्ते करगावरोडस्थित शासकीय भरडधान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ व काटापूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.गतवर्षी चाळीसगाव शेतकरी सहकारी संघाने मका खरेदीत केलेला घोळ, त्याविषयी मंत्रालय स्तरावर केलेली तक्रार यांचा संदर्भ घेत मंगेश चव्हाण यांनी भ्रष्ट व अवैध धंद्याविरुद्धचा आपला लढाच सुरुच राहील, असेही स्पष्टपणे सांगितले.यावेळी यावेळी भडगाव शेतकी संघाचे चेअरमन प्रताप हरी पाटील तहसीलदार अमोल मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सरदार राजपूत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम, व्हाईस अरमन सुभाष पाटील, बी.वाय.चव्हाण, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील व संचालक मंडळ उपस्थित होते.आमदार चव्हाण पुढे म्हणाले, मागील काळात शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा हमीभाव मिळण्यासाठी भ्रष्ट यंत्रणेने नाडल्याने मला शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागले. मोठ्या विश्वासाने भडगाव शेतकी संघाकडे चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याची जबाबदारी दिली गेली आहे.'हे' दुर्दैव म्हणावे लागेल...तीन हजार सभासद संख्या असणाऱ्या चाळीसगाव शेतकरी सहकारी संघाकडे असणारे भरडधान्य खरेदीचे काम भडगाव संघाकडे सोपविले जाणे हे दुर्दैवच म्हणावे लागेल. शेतकरी संघातील निष्क्रिय नेतृत्वाचे हे अपयश असून आमच्या महाविकास आघाडीतील स्थानिक नेतृत्वाने याकडे केलेले दुर्लक्षदेखील तेवढेच जबाबदार असल्याचा टोला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम यांनी यावेळी लगावला.४५९ शेतकऱ्यांनी नोंदणीशनिवारी दुपारी बारापर्यंत खरेदी केंद्रावर ४५९ शेतकऱ्यांनी भरड धान्य विक्रीसाठी नोंदणी केली आहे. ही वर्गवारी ३४३ मका, ५९ ज्वारी तर ५७ बाजरी अशी आहे. शासनातर्फे मक्याला १८५० रुपये, ज्वारीला २६२० रुपये व बाजरीला २१५० रुपये इतका हमीभाव मिळणार आहे. नोंदणी सुरू असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भडगाव शेतकी संघाच्या कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन भडगाव शेतकी संघाचे व्यवस्थापक अवधूत देशमुख, व्ही.बी.बाविस्कर, दिलीप नरवाडे यांनी केले आहे.

टॅग्स :MarketबाजारChalisgaonचाळीसगाव