वाघडू येथे संत सेना महाराज पुण्यतिथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:20 IST2021-09-06T04:20:01+5:302021-09-06T04:20:01+5:30
वाघडू, ता. चाळीसगाव : संत सेना बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. संत ...

वाघडू येथे संत सेना महाराज पुण्यतिथी
वाघडू, ता. चाळीसगाव : संत सेना बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
संत सेना बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्यामकांत अहिरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दरवर्षी संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात येते. मात्र गेल्या दोन-अडीच वर्षांपासून कोविड आजाराच्या पार्श्वभूमीवर पालखी मिरवणूक न काढता माधव अहिरे यांच्या घरी सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येते. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र अहिरे, सचिव प्रवीण अहिरे, खजिनदार योगेश अहिरे, ज्ञानेश्वर अहिरे, गणेश कदम, माधव अहिरे, भानुदास अहिरे, पुंजाराम अहिरे, बारकू कदम, रमेश अहिरे, मच्छिंद्र अहिरे, संतोष अहिरे, विकी अहिरे, पुष्पक अहिरे, जिजाबाई अहिरे, अनिता अहिरे, रेखाबाई अहिरे, भारती अहिरे, जया अहिरे, वर्षा अहिरे, मनीषा अहिरे आदी समाजबांधव उपस्थित होते.