पुण्यातील बांधकाम व्यावसायिकदेवेन शहा हत्या प्रकरण, आरोपी लपला जळगावातील हॉटेलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 13:06 IST2018-01-23T13:03:48+5:302018-01-23T13:06:47+5:30
‘इन्काऊंटर’च्या भीतीने आला जळगावात

पुण्यातील बांधकाम व्यावसायिकदेवेन शहा हत्या प्रकरण, आरोपी लपला जळगावातील हॉटेलात
ऑनलाईन लोकमत
जळगाव / पुणे, दि. 23- पुण्यातील बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांच्यावर गोळीबार करणारा रवींद्र सदाशिव चोरगे (वय 41, रा़ निलपद्म सोसायटी, माणिकबाग, पुणे) हा पोलिसाच्या इन्काऊंटरच्या भीतीने जळगाव शहरातील के. पी. हॉटेलात लपून बसला होता. त्याला रविवारी डेक्कन पोलिसांनी या हॉटेलमधून अटक केली.
देवेन शहा यांची रवींद्र चोरगे आणि राहूल शिवतारे यांनी सायली अपार्टमेंटमध्ये 13 जानेवारी रोजी रात्री गोळ्या झाडून हत्या केली. शहा यांची हत्या करताना सीसीटीव्हीमध्ये हल्लेखोरांचे फुटेज पोलिसांना मिळाले होत़े शिवतारेने पिस्तूलातून झाडलेल्या गोळ्या शहा यांना लागल्या. तर चोरगेने झाडलेल्या गोळ्या तेथे पडलेल्या सापडल्या होत्या. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून पुण्यातून बाहेर पडले.
नंतर ही दुचाकी कोठे तरी टाकून ते एसटी बस, लक्झरी बसने फिरु लागल़े खोपोलीहून ते अक्कलकोट व तेथून ठाणे, इंदौर, उज्जैनेवरुन गेल्या गुरुवारी ब:हाणपूर येथे गेल़े आपण एकत्र राहिलो तर पकडले जाऊ व पोलीस आपला इन्काऊंटर करतील़ अशी भीती वाटू लागल्याने तेथून ते वेगळे झाल़े चोरगे हा थेट जळगावात आला होता.
रवींद्रचे अंडरवल्र्डशी संबंध
पोलिसांनी केलेल्या तपासात रवी चोरगे याचे मुंबईतील अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचे समोर आले आहे.
ब:हाणपूर येथून शहरात पोहचला रवींद्र
रवींद्र चोरगे तेथून जळगावला आला व हॉटेल के.पी.मध्ये राहू लागला़ याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कदम, सतीश सोनावणे, पांडुरंग जगताप आणि पोलीस नाईक पांचाळ यांचे पथक तातडीने जळगावला आले. त्यांनी रवींद्रला रविवारी ताब्यात घेऊन पुण्याला नेले. या कारवाईवेळी डेक्कन पोलिसांनी स्थानिक पोलिसांची मदत घेतली. या वृत्तास जळगावातील एका पोलीस अधिका:याने दुजोरा दिला आहे.
या घटनेतील रवींद्र चोरगे याला जळगाव शहरातील हॉटेल के.पी.मधून अटक करण्यात आली. त्याचा दुसरा साथीदार फरार आहे. रवींद्र व राहुल दोघांकडे हत्यारे होती़ त्यांनी ती कोठेतरी टाकून दिली आहेत़ त्यांचा नेमका उद्देश काय होता, हे अजून स्पष्ट झालेले नाही़ त्याचा तपास सुरु आहे.
-डॉ.बसवराज तेली, पोलीस उपायुक्त, पुणे.