वर्डी येथे वादळाने धुमाकूळ घातलेल्या नुकसानग्रस्तांचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:13 IST2021-05-31T04:13:19+5:302021-05-31T04:13:19+5:30

जवळपास दीडशे घरांच्या छतांचे, उडालेल्या पत्र्यांचे, झोपड्यांचे नुकसानीदरम्यान पंचनामे करण्यात आले. यासाठी चोपडा तालुक्याच्या आमदार लता सोनवणे, माजी विधानसभा ...

Punchnama of the victims of the storm at Verdi | वर्डी येथे वादळाने धुमाकूळ घातलेल्या नुकसानग्रस्तांचे पंचनामे

वर्डी येथे वादळाने धुमाकूळ घातलेल्या नुकसानग्रस्तांचे पंचनामे

जवळपास दीडशे घरांच्या छतांचे, उडालेल्या पत्र्यांचे, झोपड्यांचे नुकसानीदरम्यान पंचनामे करण्यात आले. यासाठी चोपडा तालुक्याच्या आमदार लता सोनवणे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, तहसीलदार अनिल गावित, तालुका कृषी अधिकारी प्रशांत देसले, सहाय्यक कृषी अधिकारी प्रशांत पवार, राजेंद्र पाटील, वर्डी सरपंच बबिता धनगर, डॉ. कांतीलाल पाटील, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष आदींनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तत्काळ पंचनामा करण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करून यंत्रणेकडून पंचनामे करून घेतले. राष्ट्रवादी काॅंग्रेस चोपडातर्फे ज्यांचे संसार या वादळादरम्यान उघड्यावर आले, अशांसाठी किराणा व आवश्यक साहित्यदेखील वाटप करण्यात आले. ग्रामसेवक बी. पी. यहिदे, तलाठी किरण महाजन, ग्रामपंचायत लिपिक विश्वास शिंदे, शिपाई अनिल पाटील, कोतवाल छोटू साळुंके यांनी पंचनामे केले.

===Photopath===

300521\30jal_6_30052021_12.jpg

===Caption===

वर्डी येथे वादळाने धुमाकूळ घातलेल्या नुकसानग्रस्तांचे पंचनामे

Web Title: Punchnama of the victims of the storm at Verdi