जामनेर, जि.जळगाव : येथील बसस्थानकावर सोमवारी गर्दीचा गैरफायदा घेत खिसेकापूंंनी धुमाकूळ घातल्याने दोघा प्रवाशांना ७० हजारांचा फटका बसला.धामणगाव बढे येथील फारूक हारून कच्छी हे व्यापारी जळगाव जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना त्यांच्या बॅगेतून चोरट्याने ६० हजारांची रोकड लांबविली. गुंजाजी नारायण बर्गे (रा.जामनेर) हे औरंगाबाद गाडीत चढत असताना चोरट्याने त्यांच्या खिशातील १० हजारांची रोकड लांबविली.गेल्या आठवड्यात बसस्थानकावर जळगाव गाडीत चढत असलेल्या शिक्षिकेच्या गळ्यातील चार ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरट्याने लांबविली होती. वारंवार घडत असलेल्या चोरीच्या घटनांनी प्रवासी त्रस्त झाले असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. बसस्थानकावर कायमस्वरूपी पोलिसांची ड्युटी लावावी, अशी मागणी होत आहे.चोरीच्या दोन्ही घटना अवघ्या पाच मिनिटात घडल्या. चोरट्यांचा पाठलाग विद्यार्थ्यांनी पळसखेडे पर्यंत केला. मात्र ते दुचाकीवरून पसार झाले.अपूर्ण पोलीस बळदरम्यान, येथील पोलीस ठाण्यात पोलिसांची संख्या कमी असल्याने तपास कामावर परिणाम जाणवतो. गांधी चौक, नगरपालिका चौकात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीला सुिस्थतीत आणण्यासाठी कायमस्वरुपी पोलिसाची आवश्यकता आहे. होमगार्ड या कामात त्यांना मदत करताना दिसतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन पुरेसा बंदोबस्त उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.बाजार समिती आवारात स्थलांतरीत बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने शोध घेण्यास अडथळे येतात. तरीही संशयिताचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.- प्रताप इंगळे, पोलीस निरीक्षक, जामनेर
जामनेर बसस्थानकावर खिसेकापूंंचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 17:29 IST
बसस्थानकावर सोमवारी गर्दीचा गैरफायदा घेत खिसेकापूंंनी धुमाकूळ घातल्याने दोघा प्रवाशांना ७० हजारांचा फटका बसला.
जामनेर बसस्थानकावर खिसेकापूंंचा धुमाकूळ
ठळक मुद्देचोरीच्या घटनेतील वाढ चिंताजनकपुरेसा बंदोबस्त उपलब्ध करुन देण्याची मागणी