पाडळसेच्या शेतक:याचा उष्माघाताने मृत्यू

By Admin | Updated: April 6, 2017 12:23 IST2017-04-06T12:23:34+5:302017-04-06T12:23:34+5:30

यावल तालुक्यातील पाडळसे येथील राजेंद्र धर्मराज भिरुड (49) या शेतक:याचा बुधवारी संध्याकाळी उष्माघाताने मृत्यू झाला़

Pulsele's Farmer: The Heat Shot Dead | पाडळसेच्या शेतक:याचा उष्माघाताने मृत्यू

पाडळसेच्या शेतक:याचा उष्माघाताने मृत्यू

 भुसावळ, दि.6- यावल तालुक्यातील पाडळसे येथील राजेंद्र धर्मराज भिरुड (49) या शेतक:याचा बुधवारी संध्याकाळी उष्माघाताने मृत्यू झाला़ उष्माघाताचा हा जिल्ह्यातला दुसरा बळी आह़े 

मूळचे शिरसाड येथील रहिवासी असलेले भिरूड हे गेल्या 20 वर्षांपासून व्यवसायानिमित्त पाडळसे, ता़ यावल येथे स्थायीक झाले होत़े  बुधवारी दुपारी ते शेतात कडबा बांधत असताना त्यांना ऊन लागल़े सायंकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पाडळसे येथील डॉ़ उदय चौधरी यांच्याकडे आणल्यानंतर त्यांनी तातडीने भुसावळ येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची सूचना केली़ भुसावळ येथे आणत असतानाच रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला़  ऊन लागल्यामुळेच शेतक:याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितल़े  गुरुवारी सकाळी शिरसाड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल़े 

Web Title: Pulsele's Farmer: The Heat Shot Dead