प्रोस्पेक्टिव्ह रिसर्च स्कीम पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:21 IST2021-08-24T04:21:46+5:302021-08-24T04:21:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केसीई सोसायटीच्या पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी आणि रिसर्च महाविद्यालयात नुकतेच प्रोस्पेक्टिव्ह रिसर्च ...

प्रोस्पेक्टिव्ह रिसर्च स्कीम पुस्तकाचे प्रकाशन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केसीई सोसायटीच्या पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी आणि रिसर्च महाविद्यालयात नुकतेच प्रोस्पेक्टिव्ह रिसर्च स्कीम या पुस्तकाचे प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी कार्यक्रम प्रमुख म्हणून अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन जावळे व प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे, पुस्तकाचे प्रमुख संपादक प्रा. संदीप पाटील, प्रा. जावेद खान यांची उपस्थिती होती. दरम्यान, प्रकाशन कार्यक्रमानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. एकता जगन्नाथ फुसे (बायोटेक्नॉलॉजी विभाग) व ललित दिलीप पाटील (ऑरगॅनिक केमिस्ट्री) या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे यांच्या हस्ते सत्कार झाला. नंतर प्रा. रवींद्र पाटील, उल्हास पाटील यांच्यासह विविध विषयांत प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.