प्रगती शाळेत कोविड हस्तलिखिताचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:19 IST2021-09-23T04:19:59+5:302021-09-23T04:19:59+5:30
जळगाव : शहरातील प्रगती विद्यामंदिर शाळेत शिक्षकांमार्फत लिखित कोविड-१९ या हस्तलिखिताचे प्रकाशन विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मंगला दुनाखे यांच्या ...

प्रगती शाळेत कोविड हस्तलिखिताचे प्रकाशन
जळगाव : शहरातील प्रगती विद्यामंदिर शाळेत शिक्षकांमार्फत लिखित कोविड-१९ या हस्तलिखिताचे प्रकाशन विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मंगला दुनाखे यांच्या हस्ते करण्यात आले. या हस्तलिखितात कोरोना या रोगाची लक्षणे, उपाय, तसेच घेण्यात येणारी खबरदारी, मनात असलेले विविध प्रश्न यांची उत्तरे स्पष्टीकरणात्मक स्वरूपात देण्यात आली आहे.
हस्तलिखितात कोरोना याविषयी जनजागृतीचे काम करण्यात आले आहे. प्रकाशन सोहळ्याप्रसंगी विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल यांनी मनोगत व्यक्त करताना ही भयावह परिस्थिती आहे. यात आपल्याला एकजुटीने राहून या परिस्थितीचा सामना करायचा आहे व ही शैक्षणिक वाटचाल अशीच अविरत चालू ठेवायची आहे असे सांगितले. सचिव सचिन दुनाखे यांनी हस्तलिखिताला मार्गदर्शन करणाऱ्या मुख्याध्यापिका शोभा फेगडे यांचे कौतुक केले. याप्रसंगी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.