जळगाव जनता बँकेच्या २०२१ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:17 IST2020-12-31T04:17:01+5:302020-12-31T04:17:01+5:30
जळगाव : जळगाव जनता सहकारी बँकेच्या २०२१ दिनदर्शिकेचे बुधवार, ३० डिसेंबर रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयात मान्यवरांच्या ...

जळगाव जनता बँकेच्या २०२१ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
जळगाव : जळगाव जनता सहकारी बँकेच्या २०२१ दिनदर्शिकेचे बुधवार, ३० डिसेंबर रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. कोविड काळात योगदान देणारे बँकेचे ग्राहक डॉ. परीक्षित बाविस्कर, अतुल अग्रवाल, गोविंद जोशी, मनोहर नाथानी, पंकज बऱ्हाटे,तुतारी वादक लक्ष्मण अंभोरे, शाहीर सखाराम जोशी यांचे नातू शाहीर संग्राम जोशी, विवेकानंद शाळेतील शिक्षक व दिनदर्शिकेतील माहिती एकत्रित करणारे ज्ञानेश्वर पाटील, दिनदर्शिकेतील स्केच साकारणारे नितीन पाटील यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. यावेळी केशवस्मृती सेवा समूहाचे अध्यक्ष भरत अमळकर, बँकेचे अध्यक्ष अनिल राव,उपाध्यक्ष डॉ. प्रताप जाधव, बँकेचे माजी अध्यक्ष संजय बिर्ला, केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील, बँकेचे संचालक सतीश मदाने, सुरेश केसवाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन अधिकारी स्वाती भावसार यांनी केले तर संचालक अधिकारी अतुल नाईक यांनी आभार मानले. ३१ डिसेंबरपासून दिनदर्शिकेचे वितरण होणार आहे.