शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

जनकल्याण समितीचा उपक्रम : जळगावात झोपडपट्टीतील मुलांना देशभक्तीसह संस्काराचे सिंचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 10:26 IST

लहानपणापासून मोबाइल, टिव्हीमध्ये गुंतून असलेली मुले असे एकिकडे चित्र असताना जळगावात मात्र झोपडपट्टीतील मुलांना दररोज संस्काराचे धडे देण्यासह देशभक्तीची ज्योत जागविण्याचे काम संस्कार केंद्रामार्फत केले जात आहे.

विजयकुमार सैतवाल  जळगाव : लहानपणापासून मोबाइल, टिव्हीमध्ये गुंतून असलेली मुले असे एकिकडे चित्र असताना जळगावात मात्र झोपडपट्टीतील मुलांना दररोज संस्काराचे धडे देण्यासह देशभक्तीची ज्योत जागविण्याचे काम संस्कार केंद्रामार्फत केले जात आहे. दररोज संध्याकाळी वाल्मीकनगर या भागात या मुलांच्या मुखातून विविध तालबद्ध स्तोत्र कानी पडत असल्याचे सुखावह चित्र आहे. जळगावातील वाल्मीकनगर या भागात २०१२ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्यावतीने बाल संस्कार केंद्र चालविले जात आहे. यामाध्यमातून संस्कारी पिढी घडविण्याचे काम समितीच्यावतीने अविरतपणे सुरू आहे.

एरव्ही झोपडपट्टी भागातील मुलांकडे फारसे कोणी लक्ष देत नाही व मोल मजुरीमुळे ते शिक्षणापासूनही दूर राहतात. मात्र या मुलांनादेखील आपल्या संस्कृती, देवदेवतांची माहिती, राष्ट्रीय पुरुष व त्यांच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी समितीच्यावतीने पुढाकार घेऊन संस्कार रुजविण्याचे कार्य हाती घेण्यात आले. याठिकाणी रवींद्र अरविंद शुक्ल हे भारतीय संस्कृतीची ओळख या मुलांना करून देत आहे.सुरुवातीला या ठिकाणी चार ते पाच मुले यायची. हळूहळू त्यात वाढ होऊन सहा ते १३ वर्षे वयोगटातील मुलांची ही संख्या २५ ते ३० वर पोहचली आहे. विशेष म्हणजे यामध्ये १२-१३ मुली तर १५-१६ मुले असतात.

दररोज संध्याकाळी ही सर्व मुले या केंद्रात एकत्र येतात व हात जोडून, एका स्वरात रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसा यासह विविध स्तोत्र पठण करून घेतले जातात. आता तर या मुलांचे हे स्तोत्र तोंडपाठ झाले असून दररोज संध्याकाळी या परिसरात लहानग्यांच्या मुखातून हे तालबद्ध स्वर ऐकून येणाऱ्या-जाणा-याचे आपसूकच लक्ष वेधले जाते. या सोबतच या ठिकाणी राष्ट्रीय पुरुषांची माहिती देऊन त्यांच्या कार्याची ओळख मुलांना करून दिली जाते.

याचाच एक सुखद अनुभव सांगताना समितीतील जिल्हा आरोग्य आयाम प्रमुख नरेंद्र शुक्ल म्हणाले की, निबंध स्पर्धेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयावरील निबंध लिहिण्यासाठी या केंद्रातून मुलांना रात्रीच्या वेळी पुस्तक उपलब्ध करून दिले व सकाळी या निबंध स्पर्धेत याच मुलाने पारितोषिक मिळविले. त्यामुळे या केंद्रातून संस्कार रुजविले जात असल्याची भावना निर्माण होऊन हे केंद्र मुलांना आधार वाटू लागले आहे व इकडे त्यांची ओढ वाढत आहे. मुलांमध्ये देशभक्तीचीही ज्योत जागविण्याचेही काम हे केंद्र करीत आहे.