शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
3
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
4
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
5
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
6
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
7
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
8
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
9
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
10
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
11
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
12
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
13
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
14
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
15
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
16
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
17
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
18
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
19
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
20
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करुन विधायक कार्यास मदत करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 8:00 PM

जळगाव  - जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव साधा पध्दतीने साजरा करुन गणेशोत्सव मंडळांनी विधायक कामात ...

जळगाव - जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव साधा पध्दतीने साजरा करुन गणेशोत्सव मंडळांनी विधायक कामात प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.सार्वजनिक गणेशोत्सव 2020 ची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात  राऊत यांच्याअध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ पंजाबराव उगले, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अपर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस अधिक्षक डॉ नीलभ रोहन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, प्रांताधिकारी दीपमाला चौरे, महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील यांचेसह शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. तर झूम ॲपद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचेसह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी आणि पोलीस निरिक्षक सहभागी झाले होते.उपस्थितांना मार्गदर्शन करतांना राऊत म्हणाले की, यंदाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून याबाबत मार्गदर्शक सुचनाही निर्गमित केल्या आहेत. या मार्गदर्शक सुचनांची माहिती यंत्रणेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी करुन द्यावी. त्याचबरोबर या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांनी महापालिका व स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रमात रक्तदान, प्लाझ्मा दान, विषयक जनजागृती, रुग्णांना मोफत सकस आहार पुरविणे, घरपोच आरोग्य तपासणी करण्यास प्रशासनास मदत व सहकार्य करावे. त्याचबरोबर श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढू नयेत. पूजा व आरती करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक मंडळाकरीता मुर्ती 4 फुट व घरगुती गणपतीसाठी 2 फुटांच्या मर्यादेत असावी. श्रीगणेशाचे दर्शन सुविधा ऑनलाईन, वेबसाईट, फेसबुक, केबलद्वारे उपलब्ध करुन द्यावी. गणपती मंडपामध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात यावी. शरिरीक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम पाळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीनसाठी सार्वजनिक मंडळांना मदतीचे आवाहनकोरोना बाधित रुगणांच्या रक्तामधील ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्यामुळे त्यांना वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध करुन देणे आवश्यक असते. ग्रामपंचायत स्तरावर किवा प्राथमिक आरोग्य केंदस्तरावर ऑक्सिजनची आवश्यकता भासणाऱ्या रुग्णांकरीता तत्काळ ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन  उपयोगी ठरते. जिल्ह्यातील प्रत्येक गावस्तरावर हे मशीन असावे याकरीता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हादंडाधिकारी राऊत यांनी जिल्ह्यातील गणेश मंडळांना केले आहे.कारखानदारांनी मुर्ती बनविताना शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे- डॉ. उगलेशासनाच्या मार्गदशक सुचनांनुसार सार्वजनिक मंडळाकरीता मुर्तीची उंची 4 फुट व घरगुती गणपतीसाठी 2 फुटांची मर्यादा दिलेली असल्याने गणेशमुर्ती बनविणाऱ्या कारखानादारांनी शासनाच्या या सुचनेचे पालन करावे. तसेच गणेशमंडळाना आवश्यक त्या परवानग्यांसाठी पोलीस अधिक्षक कार्यालयात एक खिडकी योजना सुरु करण्यात येणार आहे. मंडळांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी यावेळी केले.एक गाव, एक गणपती संकल्पना राबवावी - डॉ. पाटीलकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात एक गाव, एक गणपती ही संकल्‍पना राबवावी. त्याचबरोबर पुजा व आरतीवेळी शासनाच्या मार्गदर्शक सुचना पाळल्या जातील याची दक्षता गणेश मंडळांनी घ्यावी. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी. एन. पाटील यांनी केले.गणेश मंडळाना परवानगी आवश्यक - श्री. कुलकर्णीशासनाच्या नियमांनुसारसार्वजनिक गणेश मंडळांना मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक आहे. त्याचबरोबर मंडपाची उभारणी करताना रस्ता, फुटपाथ अथवा कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची दक्षता मंडळांनी घ्यावी. व त्यानुसार मंडळांनी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच मूर्ती विक्रेत्यांसाठी जी. एस. ग्राउंड व सागर पार्क या ठिकाणी व्यवस्था करण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी बैठकीत दिली. बैठकीच्या सुरुवातीस निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची माहिती सर्व यंत्रणांना दिली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव