शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

जळगावातील बंदिस्त नाट्यगृह जानेवारीत होणार नागरिकांसाठी खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 2:35 PM

पालकमंत्र्यांनी केली पाहणी

ठळक मुद्दे३१ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याची केली सूचनापहिले दहा नाट्यप्रयोग नाममात्र दरानेसुमारे २० टक्के काम अद्यापही बाकी

जळगाव: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवार दि.४ रोजी महाबळ रस्त्यावरील बंदिस्त नाट्यगृहाच्या कामाची पाहणी केली. नाट्यगृहाचे काम ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी व संबंधीत अधिकाºयांना दिल्या. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची सूचना जिल्हाधिकाºयांना केली. उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांची तारीख घेत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र या नाट्यगृहाचे अद्याप सुमारे २० टक्के काम बाकी असून निधी वेळेत उपलब्ध झाला तरच डिसेंबरअखेर हे काम पूर्ण होऊ शकेल, असे समजते.बंदिस्त नाट्यगृहाचे काम रखडले आहे. त्या कामाला पालकमंत्र्यांनी व त्यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकाºयांनी लक्ष घातल्यानंतर गती आली. आधी दिवाळीपर्यंतच हे काम पूर्ण करण्याची सूचना केली होती. मात्र निधी अभावी काम रखडल्याने डिसेंबरअखेर कोणत्याही परिस्थितीत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी स्वत: वेळोवेळी भेट देऊन कामाचा आढावा घेत आहेत. सोमवारी जिल्हा दौºयावर आलेल्या पालकमंत्र्यांनीही या बंदिस्त नाट्यगृहाच्या कामाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी महापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.बाहेरूनच केली पाहणीपालकमंत्री १०.३० वाजता या ठिकाणी भेट देणार होते. मात्र त्यांना धरणगावला जायचे असल्याने १० वाजताच ते बंदिस्त नाट्यगृहाच्या पाहणीसाठी पोहोचले. नाट्यगृहाच्या आवारात गाडीतून उतरल्यावर केवळ मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जाऊन त्यांनी नाट्यगृहाची पाहणी केली. किती काम बाकी आहे? काय अडचणी आहेत? याची विचारणा केली. त्यावर या कामासाठी साडेतीन कोटीच्या निधीची गरज असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. हा निधी जिल्हाधिकाºयांनी उपलब्ध करून देण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली.उद्घाटनाला मुख्यमंत्री येणारया बंदिस्त नाट्यगृहाचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. जानेवारीत या नाट्यगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे नियोजित असून त्यासाठी मुख्यमंत्र्यांची तारीख घेत असल्याचे सांगितले.पहिले दहा नाट्यप्रयोग नाममात्र दरानेनवीन वर्षात नाट्यगृह नाट्य रसिकांसाठी खुले करुन पहिले दहा प्रयोग नाममात्र फी घेऊन नाटय रसिकांना दाखविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संस्थेची मदत घेण्याचा विचार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.नामकरणाबाबतही चर्चाया बंदिस्त नाट्यगृहाचे नाव कुठे टाकायचे असा प्रश्न पालकमंत्र्यांनी केला. त्यावर अधिकाºयांनी दर्शनी भागातील भिंतीवरील एक जागा दाखविली. यावेळी महापौर ललित कोल्हे यांनी या नाट्यगृहाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी केली. मात्र काम पूर्ण झाल्यावर याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.