शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कारगील युद्धात शहीद जवानाच्या कुटुंबीयांना दोन हेक्टर जागा प्रदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 21:50 IST

शहीद जवान- भानुदास सोनु बेडीस्कर यांना कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी शासनाकडून दोन हेक्टर जागा देण्यात आली.

ठळक मुद्देपारोळा : तब्बल २३ वर्षानंतर झाली प्रक्रीया पूर्ण 

लोकमत न्यूज नेटवर्क

पारोळा : तामसवाडी ता. पारोळा येथील शहीद जवान- भानुदास सोनु बेडीस्कर यांना कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी शासनाकडून दोन हेक्टर जागा देण्यात आली. पारोळा - धरणगाव रोडवर ही जागा आहे. यासंबंधीचे कागदपत्रे गुरुवारी बेडीस्कर यांच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आली. यासाठी शासनाला तब्बल २३ वर्षाच्या कालावधी लागला. 

 जम्मू कश्मिरमधील कुप्पवाडा येथे कारगिल युद्धात भानुदास बेडिस्कर यांना दि.२८ ऑगस्ट १९९७ रोजी वीर मरण आले होते. शहिद झाल्या नंतर तब्बल २३ वर्षानी ही २ हेक्टर जागा वीरपत्नी सरला भानुदास बेडिस्कर याना सुपूर्द करण्यात आली.

दोन हेक्टर जागा  तहसीलदार अनिल गवांदे यांच्याहस्ते उताऱ्याच्या कागदपत्रांसह सोपविण्यात आली. शहीद जवान भानुदास बेडीस्कर हे पहिलेच शहीद जवान आहेत, वीर मरणानंतर कुटुंबाला शासकीय जागा मिळाली आहे. 

याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत , उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांनी पाठपुरावा करून जागा उपलब्ध करून दिली. यावेळी तहसीलदार बी.आर शिंदे , शहर तलाठी निशिकांत पाटील, गौरव लांजेवार,  एस.पी पाटील , भुमी अभिलेखचे शिंदे व वीरपत्नी सरला बेडीस्कर व त्याचे कुटुंब उपस्थित होते.

टॅग्स :JalgaonजळगावParolaपारोळाSoldierसैनिक