नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:19 IST2021-09-12T04:19:56+5:302021-09-12T04:19:56+5:30
चाळीसगाव ते पाचोरा तालुक्यातील नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे जीवितहानी झाली असून, पशुपालकांनीदेखील गुरेढोरे गमावले आहेत. ...

नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत देणार
चाळीसगाव ते पाचोरा तालुक्यातील नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे जीवितहानी झाली असून, पशुपालकांनीदेखील गुरेढोरे गमावले आहेत. शेतांमध्ये पाणी शिरल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे तर पूल व बंधारेलगतची जमीन खरडून गेलेली असल्यामुळे तत्काळ पंचनामा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आठवड्याभरात हे कामकाज पूर्ण होऊन किती हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे, हे समोर आल्यानंतर राज्यव्यापी नुकसान भरपाईचा निर्णय घेण्यात येईल, अशीदेखील माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी आमदार किशोर पाटील, शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते रावसाहेब पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उद्योजक मुकुंद बिल्दिकर, दीपकसिंग राजपूत, पद्मसिंह पाटील, रमेश बाफना, गणेश पाटील, गंगाराम पाटील, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे यांची उपस्थिती होती.