तिरंगा घेऊन नाचलो याचा सार्थ अभिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 17:21 IST2019-08-06T17:20:45+5:302019-08-06T17:21:49+5:30
जामनेर , जि.जळगाव : नाशिक जिल्ह्यात पूर स्थिती गंभीर असताना एनडीआरएफच्या टीमसोबत कमरे इतक्या पाण्यात फिरलो, पुरात अडकलेल्या नागरिकांना ...

तिरंगा घेऊन नाचलो याचा सार्थ अभिमान
जामनेर, जि.जळगाव : नाशिक जिल्ह्यात पूर स्थिती गंभीर असताना एनडीआरएफच्या टीमसोबत कमरे इतक्या पाण्यात फिरलो, पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविले. मला परिस्थितीचे गांभीर्य कळते. तुमच्यासारखा मी धरणात पाणी नाही तर काय करू... असे बोलत नाही, असे प्रत्युत्तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सांगितले.
नाशिकमध्ये पूरस्थिती असताना महाजन तिरंगा घेऊन नाचत होते, अशी टीका पवार यांनी केली असून, यावर महाजन यांनी जामनेरला पत्रकार परिषद घेऊन प्रति उत्तर दिले. ते म्हणाले की, पूरस्थितीचे गांभीर्य मला आहे. राज्यात कोठेही आपत्ती आली की मी कोठे असतो हे राज्यातील जनतेला माहीत आहे. दुष्काळाचे वेळेस तुम्ही काय बोलले हे सर्व जाणून आहेत.
कलम ३७० रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी देशावरील कलंक दूर केला. समस्त देशवासियांसाठी ही आनंदाची बाब असल्याने मी हातात तिरंगा घेऊन नाचलो, याचा मला सार्थ अभिमान आहे, असेही त्यांनी सांगितले.