शासनाच्या उदासिनतेचा केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:46 IST2020-12-04T04:46:17+5:302020-12-04T04:46:17+5:30

जळगाव- जगण्याचे तत्वज्ञान आपल्या बोलीभाषेतून सांगणा-या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम गुरूवारी आसोदा येथील बहिणाबाईंच्या माहेरात ...

Protested the government's indifference | शासनाच्या उदासिनतेचा केला निषेध

शासनाच्या उदासिनतेचा केला निषेध

जळगाव- जगण्याचे तत्वज्ञान आपल्या बोलीभाषेतून सांगणा-या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम गुरूवारी आसोदा येथील बहिणाबाईंच्या माहेरात झाला. शासनाच्या उदासिन धोरणामुळे १२ वर्षानंतरही आसोद्यातील माहेरात बहिणाबाईंचे स्मारक पूर्ण होवू शकले नाही. यामुळे या शासकीय उदासिनतेचा निषेध करण्यात आला. स्मारकाचे काम पूर्ण व्हावे यासाठी संघर्ष करण्याचाही ठराव यावेळी करण्यात आला.

स्मारक समितीचे उपाध्यक्ष प्रदीप भोळे, रविकांत चौधरी, तुषार महाजन, संजीव पाटील, महेश भोळे, खेमचंद महाजन यांनी बहिणाईच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी नुकताच उज्जैन येथे कालिदास संस्कृत अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्या बद्दल गावातील तरूण शिल्पकार संतोष साळवे यांचा ग्रामस्थांच्यावतीने सन्मान करण्यात आला. शिल्पकले विषयी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भाऊंचे फाऊंडेशनचे सचिन चौधरी, उमेश बाविस्कर, योगेश वाणी, लिलाधर जोशी, सिताराम सरोदे, विजय कोल्हे, निखील रङे, प्रकाश महाजन, सुभाष महाजन, अरविंद सरोदे उपस्थित होते.

Web Title: Protested the government's indifference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.