चाळीसगाव - मुंबई येथील घाटकोपर येथे भाजपाचे आमदार राम कदम यांनी मुलींसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी महिला, युवक व युवती काँग्रेसतर्फे बुधवारी निषेध नोंदविण्यात आला. या आशयाचे निवेदन नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना देण्यात आले.आमदार राम कदम यांनी ‘एखाद्या मुलीला प्रपोज केले असता ती नाही म्हणत असेल तर तुमच्या आई वडिलांना समोर आणा व त्यांचा नकार असला तर तिला पळवून आणा’ असे वक्तव्य केले होते. या घटनेचा निषेध व्यक्त करीत नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी महिला तालुकाध्यक्षा सोनल साळुंखे, प्रतिभा पाटील, युवती अध्यक्षा हेमांगी शर्मा, प्रतिक्षा पाटील, अनिता शर्मा, युवक जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, शहराध्यक्ष अमोल चौधरी, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, अजय पाटील, आकाश पोळ, योगेश पाटील, यज्ञेश बाविस्कर, भाऊसाहेब पाटील, मनोज पाटील, गुंजन मोटे, स्वप्नील कोतकर, सुजित पाटील, पिनू सोनवणे, अनिकेत चव्हाण, पंजाब देशमुख, शरद मोरे आदी उपस्थित होते.
चाळीसगावात राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 21:58 IST
मुंबई येथील घाटकोपर येथे भाजपाचे आमदार राम कदम यांनी मुलींसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी महिला, युवक व युवती काँग्रेसतर्फे बुधवारी निषेध नोंदविण्यात आला.
चाळीसगावात राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध
ठळक मुद्देचाळीसगाव तहसीलदारांना दिले निवेदनराष्ट्रवादी महिला, युवती व युवक काँग्रेसचे आंदोलनआमदार राम कदम यांनी घाटकोपर येथे केले होते आक्षेपार्ह वक्तव्य