मविप्रच्या सर्वसाधारण सभेत गिरीश महाजनांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:16 IST2021-03-31T04:16:33+5:302021-03-31T04:16:33+5:30

जळगाव : गेल्या तीन वर्षांपासून आमदार गिरीश महाजन यांनी संचालक मंडळाला छळले व खोटे गुन्हे दाखल केले. संस्थेच्या मालकीची ...

Protest of Girish Mahajan at the general meeting of MVP | मविप्रच्या सर्वसाधारण सभेत गिरीश महाजनांचा निषेध

मविप्रच्या सर्वसाधारण सभेत गिरीश महाजनांचा निषेध

जळगाव : गेल्या तीन वर्षांपासून आमदार गिरीश महाजन यांनी संचालक मंडळाला छळले व खोटे गुन्हे दाखल केले. संस्थेच्या मालकीची मालमत्ता हडप करण्याचा आरोप करीत मंगळवारी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगावच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार गिरीश महाजन यांचा निषेध नोंदवून ठराव मंजूर करण्‍यात आला.

ऑनलाईन सभेच्या अध्‍यक्षस्थानी ॲड.विजय भास्करराव पाटील होते. सभेत एकूण आठ विषयांवर सविस्तर चर्चा करण्‍यात आली व त्यानंतर त्या विषयांना मंजुरी देण्‍यात आली. नंतर संचालक मंडळातर्फे सर्व सभासदांना वाढत असलेल्या कोरोना संबंधी काळजी घेण्याचे आवाहन करण्‍यात आले. तसेच आमदार तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांचा निषेध सभेत नोंदविण्‍यात आला. तसा ठराव करून तो मंजुर करण्यात आला.

Web Title: Protest of Girish Mahajan at the general meeting of MVP