पारोळा पं.स.सभापती पती विरोधात कर्मचा:यांचे आंदोलन

By Admin | Updated: July 7, 2017 13:30 IST2017-07-07T13:30:44+5:302017-07-07T13:30:44+5:30

कामातील वाढत्या हस्तक्षेपाचा निषेध म्हणून काळ्याफिती लावून केले कामकाज

The protest against Parola PMS-husband husband: The agitation | पारोळा पं.स.सभापती पती विरोधात कर्मचा:यांचे आंदोलन

पारोळा पं.स.सभापती पती विरोधात कर्मचा:यांचे आंदोलन

 ऑनलाईन लोकमत

पारोळा,दि.7 - पंचायत  समिती सभापती सुनंदा पाटील यांच्या पतीचा शासकीय कामातील वाढता हस्तक्षेप, अधिकारी, कर्मचारी यांच्याशी उद्धटपणे वागणे याच्या निषेधार्थ पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचा:यांनी शुक्रवारी सकाळी धरणे आंदोलन करीत दिवसभर काळ्याफिती लावून कामकाज केले. 
सभापती यांचे पती पांडुरंग पाटील हे सभापतींच्या गैरहजेरीत सभापती कार्यालयात बसून अधिकारी, कर्मचा:यांशी उद्धटपणे वागतात. अपमानास्पद वागणूक देतात. कर्मचा:यांच्या वयाचे भान न ठेवता त्यांच्याशी एकेरी भाषेत बोलतात. विनाकारण अधिकार गाजवितात अशी कर्मचा:यांची तक्रार आहे. 
या विरोधात सर्व कर्मचा:यांनी एल्गार पुकारला आहे. कर्मचा:यांनी पं.स.कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे करीत, दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज केले. यापुढे सभापती सुनंदा पाटील कार्यालयात असतील तरच त्यांच्या दालनात जायाचे, त्यांच्या पतीने बोलविले, काही काम सांगितले तर ते करायचे नाही, असा निर्णय कर्मचा:यांनी घेतला आहे.
या आंदोलनाच्यावेळी कार्यालय अधीक्षक एस.पी.निंबाळकर, अध्यक्ष अतुल वैष्णव, अभियंता संदीप सोनवणे, मनीषा पाटील, मनीषा सैंदाणे, सी.एम.चौधरी, शिंदे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: The protest against Parola PMS-husband husband: The agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.