खडसे यांच्यावरील ईडी कारवाईचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:12 IST2021-07-15T04:12:44+5:302021-07-15T04:12:44+5:30
फैजपूर : केंद्र सरकार किंवा महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या विरोधात बोलल्यास ईडीचा वापर भाजपच्या कार्यालयातून होतोय, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ ...

खडसे यांच्यावरील ईडी कारवाईचा निषेध
फैजपूर : केंद्र सरकार किंवा महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या विरोधात बोलल्यास ईडीचा वापर भाजपच्या कार्यालयातून होतोय, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अशाच प्रकारे नाहक त्रास दिला जातोय, असा आरोप करीत खडसे समर्थकांनी येथे प्रांताधिकारी कैलास कडलक यांना निवेदन देऊन, ईडीचा निषेध करण्यात आला आहे.
फैजपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी आमदार मनीष जैन यांच्या नेतृत्वात व मुकेश येवले, तालुका अध्यक्ष ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, शेख कुर्बान, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, अनवर खाटीक यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन दिले. यावेळी जिल्हा सरचिटणीस विजय पाटील, जी.पी. पाटील, अय्युब, साहील पटेल, करीम मन्यार, नगरसेवक रशीद तडवी, गुणवंत निळ, प्रतिभा निळ, माजी नगरसेवक संजय रल, आदिवासी जिल्हाध्यक्ष एम.बी. तडवी, शाकीर शेख, भूपेंद्र सोनवणे, विलास काठोके, गणी शेख, निवृत्ती धांडे, विनोद कोल्हे, अशोक भालेराव, रामा वसंत चौधरी, साजिद शेख, रमजान शेख आरीफ तडवी कय्युम मलक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.