दिव्यांग बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:45 IST2020-12-04T04:45:35+5:302020-12-04T04:45:35+5:30
जळगाव : जिल्ह्यात दिव्यांगांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ डॉ.विवेक सोनवणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. यावेळी डॉ.सोनवणे यांनी ...

दिव्यांग बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध
जळगाव : जिल्ह्यात दिव्यांगांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ डॉ.विवेक सोनवणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. यावेळी डॉ.सोनवणे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देखील दिले आहे.
शासन दर वर्षी दिव्यांगांसाठी जवळपास १५०० कोटी खर्च करते. मात्र या विविध योजनांचा लाभ अधिकाऱ्यांमुळे होतांना दिसत नाही. त्यामुळे दिव्यांगांसाठीच्या योजनांचा फायदा त्यांना होतच नाही. निवेदनात त्यांनी म्हटले की, पाच टक्के अखर्चित निधी लाभार्थ्यांच्या करून त्यात भ्रष्टाचार होत आहे. दिव्यांग बांधवांनी ५० टक्के घरपट्टी सवलत बंधनकारक आहे. मात्र ती मिळत नाही. दिव्यांग व्यक्ती हक्क २०१६ कायद्याची अंमलबजावणी कुठेही होत नाही. जिल्ह्यात दिव्यांगांना विना अट घरकुल देणे बंधनकारक आहे. मात्र त्याचीही अंमलबजावणी होत नसल्याचे डॉ. सोनवणे यांनी निवेदनात म्हटले आहे.