49 मालमत्तांच्या विक्रीचा प्रस्ताव
By Admin | Updated: February 9, 2016 00:41 IST2016-02-09T00:41:25+5:302016-02-09T00:41:25+5:30
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बी.एच.आर.) पतसंस्थेचा अवसायकांनी पदभार घेतल्यानंतर कामाला गती आली आहे.

49 मालमत्तांच्या विक्रीचा प्रस्ताव
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बी.एच.आर.) पतसंस्थेचा अवसायकांनी पदभार घेतल्यानंतर कामाला गती आली आहे. संस्थेच्या मालकीच्या 49 मालमत्ता व दुचाकी व चारचाकी अशा 60 वाहनांचा शोध लावण्यात यश आले आहे. ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी या मालमत्तांची व वाहनांची विक्री करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करणे सुरूआहे. बीएचआर पतसंस्थेच्या नियमित कामकाजासोबतच अवसायक जितेंद्र कंडारे यांनी लेखापरीक्षणावर भर दिला आहे. 10 मालमत्तांचे उतारे नियमित बीएचआर संस्थेच्या मालकीच्या मालमत्तांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र दोन कर्मचा:यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीएचआर पतसंस्थेच्या मालकीच्या आतार्पयत 49 मालमत्ता आढळून आल्या आहेत. त्यापैकी 10 मालमत्तांचे खातेउतारे हे नियमित आढळून आले आहे. काही मालमत्ता करार तत्त्वावर आहेत तर काही मालमत्तांच्या संदर्भात वाद सुरूआहेत. 60 वाहनांची मालकी मालमत्तेसोबतच संस्थेने आपल्या मालकीच्या वाहनांचादेखील शोध सुरू केला आहे. त्यात 50 दुचाकी आणि 10 चारचाकी वाहने आढळून आली. संस्थेकडून या वाहनांची आर.टी.ओ.कार्यालयातील नोंद तसेच कागदपत्रांचा शोध घेणे सुरू आहे. या वाहनांच्या लिलावाचा प्रस्तावदेखील संस्थेतर्फे तयार करणे सुरू आहे. सहकार आयुक्तांच्या परवानगीसाठी पाठविणार प्रस्ताव संस्थेच्या मिळून आलेल्या मालमत्ता तसेच जप्त वाहनांच्या लिलावाचा एकत्रित प्रस्ताव तयार झाल्यानंतर तो मंजुरीसाठी सहकार आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर लिलावप्रक्रिया पूर्ण करून त्यातून आलेल्या रकमेचे ठेवीदारांना वाटप करण्यात येणार असल्याचे अवसायक जितेंद्र कंडारे यांनी सांगितले.