चोसाकापाठोपाठ मधुकरही भाड्याने देण्याचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:19 IST2021-09-23T04:19:24+5:302021-09-23T04:19:24+5:30
फैजपूर : चोसाकानंतर आता फैजपूर येथील मधुकर साखर कारखाना भाड्याने देण्यात येणार आहे. यासाठी साखर आयुक्तांकडे प्रस्ताव सादर ...

चोसाकापाठोपाठ मधुकरही भाड्याने देण्याचा प्रस्ताव
फैजपूर : चोसाकानंतर आता फैजपूर येथील मधुकर साखर कारखाना भाड्याने देण्यात येणार आहे. यासाठी साखर आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या विषयाला मागील वर्षी झालेल्या कारखान्याच्या सभेत मंजुरी देण्यात आली होती.
या सर्व पार्श्वभूमीवर कारखान्याची ४७वी वार्षिक सर्वसाधारण गुरुवारी (दि. २३) दुपारी १ वाजता कारखाना कार्यस्थळावर ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. अध्यक्षस्थानी चेअरमन शरद महाजन असतील.
साखर कारखाना भाड्याने देण्याचा प्रस्ताव साखर आयुक्त पुणे यांच्याकडे विशेष लेखापरीक्षक साखर जळगाव यांच्या अभिप्रायासह सादर करण्यात आला आहे. यामुळे अडचणीत सापडलेल्या मधुकर कारखाना व आसवणी प्रकल्प भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग आता सुकर होताना दिसत आहे.
या वार्षिक सभेला आमदार शिरीष चौधरी, खासदार रक्षा खडसे, आमदार लता सोनवणे, माजी आमदार अरुण पाटील, माजी आमदार रमेश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती असेल. वार्षिक सभेला कारखान्याचे सभासदांनी घरूनच दिलेल्या झूम लिंकद्वारे ऑनलाइन सभेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन चेअरमन शरद महाजन यांनी केले आहे.