शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बेलगंगा कारखान्याची मालमत्ता शासनाकडून जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 19:40 IST

साखर आयुक्त, पुणे यांच्या आदेशानुसार बेलगंगा साखर कारखाना (अंबाजी शुगर्स लि.) ची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे ऊस पुरवठा शेतकऱ्यांना एफआरपी ची रक्कम न दिल्याने कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : बेलगंगा साखर कारखान्यातील २०१८-२०१९ या गळीत हंगामातील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची भारत सरकारने प्रमाणित केलेली उसाची रक्कम ( एफआरपीची रक्कम) ३८६.०६ लाख व त्यावरील १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना देण्यास कसूर केल्याच्या कारणावरून साखर आयुक्त, पुणे यांच्या आदेशानुसार बेलगंगा साखर कारखाना (अंबाजी शुगर्स लि.) ची सर्व मालमत्ता जप्त करून कारखान्याच्या मालमत्तेच्या सातबारा वरून अंबाजी शुगर्सचे नाव वगळून त्याठिकाणी मालक म्हणून महाराष्ट्र सरकारचे नाव लावण्यात आले आहे.साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी ऊस (नियंत्रण )आदेश १९६६चे कलम ३(८) नुसार आदेश पारीत केलेले आहे. बेलगंगा साखर कारखान्याची म्हणजे अंबाजी शुगर्स लि. यांची भोरस बु.व डोणदिगर या गावाच्या शिवारातील सर्व प्रॉपर्टी जप्तीचा आदेश तहसीलदार अमोल मोरे यांनी काढले. पुढील आदेश होईपर्यंत मालमत्तेची विक्रीने, देणगी म्हणून किंवा हस्तांतरण करण्यास प्रतिबंध असल्याचे या आदेशात म्हटले आहे. या आदेशानुसार कारखान्याच्या मिळकतीचे कब्जेदार आता महाराष्ट्र शासन असून तशी सातबारा उताऱ्यावर दुरुस्ती करण्यात आली आहे.भारत सरकारने कमीत कमी प्रमाणित केलेली उसाची किंमत (एफआरपी )त्या त्या साखर कारखानादार यांनी शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना न मिळाल्यास ती वसूल करण्याची जबाबदारी शासनाची असते. २०१८-१९ या वर्षातील गळीत  हंगामातील पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना थकीत रक्कम मिळाली नाही म्हणून साखर आयुक्त, पुणे यांनी कारखान्याला तीन वेळा नोटीस बजावल्या होत्या. त्यानंतरही कारखान्याने त्याची अंमलबजावणी केली नाही, म्हणून ही कारवाई करण्यात आली. कारखाना बंद असल्याने या नोटीसा  कारखान्याबाहेरील बोर्डावर लावण्यात आल्या होत्या.

शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम अदा करण्यात आलेली आहे. कारखाना दोन वर्षापासून बंद असल्याने त्याची माहिती साखर आयुक्त विभागाला दिली गेली नाही. त्यांची नोटीस ही प्रत्यक्षात मिळालेली नाही. त्यामुळे झालेली कारवाई चुकीची असून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत. वसुलीसाठी त्यांना अधिकार असला तरी त्यासाठी प्रॉपर्टी मालकी हक्क लावणे योग्य नाही.-चित्रसेन पाटील, चेअरमन, बेलगंगा साखर कारखाना

वसुलीसंदर्भातील ही शासकीय कारवाई आहे. साखर आयुक्त, पुणे व जिल्हाधिकारी जळगाव यांचे याबाबतचे आदेश होते, त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.- अमोल मोरे, तहसीलदार, चाळीसगाव

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावSugar factoryसाखर कारखाने