शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारची आश्वासनपूर्ती म्हणजे लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं : खासदार शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 21:46 IST

या सरकारचं काही खरं नाही. लबाडाचं आमंत्रण जेवल्यावरचं खरं अशी या सरकारची अवस्था आहे. राजकर्ते आपले कर्तव्य विसरले असल्याने आता निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी भडगाव येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.

ठळक मुद्देभडगावातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सरकारवर हल्लाबोलसौ.रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या इमारतीचा शुभारंभदोन वर्षात तब्बल १३ हजार शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

जळगाव : साडे चार वर्षांपूर्वी सत्तेत येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, उद्योजकांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवित आश्वासने दिले. मात्र या सरकारचं काही खरं नाही. लबाडाचं आमंत्रण जेवल्यावरचं खरं अशी या सरकारची अवस्था आहे. राजकर्ते आपले कर्तव्य विसरले असल्याने आता निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी भडगाव येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.भडगाव येथे सौ.रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या इमारतीचा शुभारंभ व कार्यकर्ता मेळावा रविवारी दुपारी ३ वाजता झाला. खासदार शरद पवार यांच्या हस्ते पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या भडगाव येथील महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.दोन वर्षात १३ हजार शेतकºयांच्या आत्महत्याशेतीसाठी आवश्यक असलेले बियाणे, रासायनिक खतांचे भाव वाढले आहेत. मात्र त्या तुलनेत शेतमालाला भाव मात्र मिळत नाही. त्यामुळे या दोन वर्षात तब्बल १३ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यकर्ते यासाठी ठोस उपाययोजना करीत नाही हे आत्महत्या वाढण्याचे मूळ कारण आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र आजही निम्मे शेतकºयांना याचा लाभ झालेला नाही.७१ हजार कोटींची कर्जमाफी दिलीपंतप्रधान मनमोहनसिंग व आपण केंद्रीय कृषी मंत्री असताना यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकºयाने आत्महत्या केल्याची बातमी आपल्या वाचनात आली होती. त्यानंतर पंतप्रधान व आम्ही त्या कुटुंबियांची भेट घेतली होती. थकीत कर्जाची बँकेची नोटीस हे आत्महत्येचे मूळ असल्याचे लक्षात आल्यानंतर तत्काळ दुसºया दिवशी मंत्रीमंडळाची बैठक घेऊन ७१ हजार कोटींची कर्जमाफी दिली. पिक कर्ज १२ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणले तसेच नियमित फेड करणाºयांना शून्य टक्के दराने कर्ज वितरण केल्याचे त्यांनी सांगितले.मोदींच्या राज्यात जीव देण्याशिवाय पर्याय नाहीज्यांच्या हातात सरकार आहे ते नुसते घोषणा करीत आहेत. मात्र या घोषणांची अंमलबजावणी मात्र करीत नाहीत. मोदी सरकारच्या राज्यात शेतकरी व कष्टकºयांना जीव देण्याशिवाय पर्याय नसल्याचा हल्लाबोल त्यांनी सरकारवर केला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगाव