वृद्धाचे पैसे लांबविणाऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:13 IST2021-07-20T04:13:31+5:302021-07-20T04:13:31+5:30

अमळनेर, जि. जळगाव : पेन व डायरी मागण्याच्या बहाण्याने वृद्धाच्या खिशातून ३ हजार ५०० रुपये लांबवणाऱ्या एक भामट्याला पकडून ...

Prolonging the old man's money | वृद्धाचे पैसे लांबविणाऱ्या

वृद्धाचे पैसे लांबविणाऱ्या

अमळनेर, जि. जळगाव : पेन व डायरी मागण्याच्या बहाण्याने वृद्धाच्या खिशातून ३ हजार ५०० रुपये लांबवणाऱ्या एक भामट्याला पकडून नागरिक व वृद्धाच्या पत्नीने काठीने झोडपून काढले. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अमळनेर बसस्थानकात घडली.

वावडे येथील हिंमत पाटील हे पत्नीसह अमळनेरात बाजारात आले होते. एक इसमाने त्यांच्याजवळ येऊन पेन मागितला. परंतु हिंमत पाटील यांनी पेन नाही सांगतच त्याने डायरी मागत त्यांच्या खिश्यातून साडेतीन हजार रुपये काढून पळ काढला. पाटील यांनी आरडाओरड करताच नागरिकांनी चोराला बसस्थानकाजवळील डी.आर. कन्याशाळेजवळ पकडले.

भामट्याला पकडल्याचे कळताच हिंमत पाटील व त्यांची वृद्ध पत्नी तिथे पोहचले आणि नागरिकांसह आजीने या चोराला काठीने चांगलेच झोडपून काढले. पैसे मिळाल्यामुळे पोलिसात कोणतीही तक्रार करण्यात आली नाही.

Web Title: Prolonging the old man's money