कन्याशाळेत रंगला पाऊस गाण्यांचा कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:20 IST2021-09-22T04:20:16+5:302021-09-22T04:20:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील प.न. लुंकड कन्याशाळेत पाऊसगाणी उपक्रमांतर्गत रेशीमधारा हा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात ...

A program of colorful rain songs in the girls' school | कन्याशाळेत रंगला पाऊस गाण्यांचा कार्यक्रम

कन्याशाळेत रंगला पाऊस गाण्यांचा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील प.न. लुंकड कन्याशाळेत पाऊसगाणी उपक्रमांतर्गत रेशीमधारा हा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी धोंड्या धोंड्या पाणी दे, नाच रे मोरा नाच व अग्गोबाई ढग्गोबाई अशी बहारदार गाणी सादर केली. मुख्याध्यापिका स्वाती नेवे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीसुद्धा कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता. यावेळी शिक्षिका रमा तारे यांनी श्रावणात घननिळा बरसला, जयश्री माळी यांनी अनुरागाचे थेंब झेलती प्रीत-लतेची पाने, शिक्षक शिवाजी सोनवणे यांनी गारवा नवा नवा, परशुराम महाजन यांनी रिमझिम के गीत सावन गाये व दिनेश वैद्य यांनी छुकर मेरे मन को अशी बहारदार गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी संगीत विभागाच्या रागिणी पुराणिक यांची उपस्थिती हाेती तर दिनेश वैद्य यांनी ढोलकवर साथ-संगत दिली. सूत्रसंचालन वंदना वाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन रागिणी पुराणिक यांनी केले.

Web Title: A program of colorful rain songs in the girls' school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.