प्राध्यापकाच्या जीवावर प्राध्यापक उठला!

By Admin | Updated: October 15, 2015 00:21 IST2015-10-15T00:21:43+5:302015-10-15T00:21:43+5:30

धुळे :बोराडी येथे असणा:या डी फार्मसी महाविद्यालयातील एका प्राध्यापकाला सहकारी प्राध्यापकानेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार 13 ऑक्टोबरला महाविद्यालयाच्या गेटजवळ घडला

Professor got up on the life of Professor! | प्राध्यापकाच्या जीवावर प्राध्यापक उठला!

प्राध्यापकाच्या जीवावर प्राध्यापक उठला!

धुळे : शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे असणा:या डी फार्मसी महाविद्यालयातील एका प्राध्यापकाला सहकारी प्राध्यापकानेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार 13 ऑक्टोबरला सकाळी 11.30 ते 12 वाजेदरम्यान महाविद्यालयाच्या गेटजवळ घडला. याप्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात धमकी देणा:या प्राध्यापकावर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पंकज सुभाष पाटील (रा.बोराडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी परेश रवींद्र बडगुजर (रा.बोराडी) याने पंकज पाटील यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.

पंकज पाटील व परेश बडगुजर हे दोघेही बोराडी येथील डी फार्मसी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. परेश रवींद्र बडगुजर याने काहीतरी गैरवर्तन केल्याने पंकज पाटील त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते. या गोष्टीचा राग आल्याने परेश बडगुजरने महाविद्यालयाच्या गेटजवळच पंकज पाटील यांचा रस्ता अडवून त्यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी पंकज पाटील यांनी बुधवारी फिर्याद दाखल केली.

या फिर्यादीवरून संशयित परेश बडगुजर याच्यावर भादंवि कलम 341, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Professor got up on the life of Professor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.