खरेदी प्रक्रिया जीएमसीकडे वर्ग करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:21 IST2021-08-21T04:21:44+5:302021-08-21T04:21:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : व्हेंटिलेटर खरेदी प्रक्रिया रद्द करण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेश दिल्यानंतर हा सर्व व्यवहारच ...

खरेदी प्रक्रिया जीएमसीकडे वर्ग करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : व्हेंटिलेटर खरेदी प्रक्रिया रद्द करण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेश दिल्यानंतर हा सर्व व्यवहारच रद्द झाला आहे. त्यामुळे याच्या आता फेरनिविदा राबविल्या जातील, मात्र, ही सर्व प्रक्रिया आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे वर्ग करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. व्हेंटिलेटर प्रकरणात आपण पुरवठादाराला पेमेंट दिले नसल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही राबविलेल्या खरेदी प्रक्रियांवर संशय निर्माण होणार असल्यानेच या प्रक्रिया जीएमसीकडे वर्ग करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. समितीने दिलेल्या अहवालानुसार जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेतला आहे. निविदा रद्द करण्याचे अधिकार प्रशासनाला होते. त्यानुसार तफावत आढळून आल्यानंतर ती रद्द करण्यात आली आल्याचे त्यांनी सांगितले.