शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

प्राचार्यांना सोबत घेवून प्रत्यक्ष दाखविल्या विद्यार्थ्यांच्या समस्या !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 15:19 IST

अभाविपचे आंदोलन : घोषणांनी दणाणले महाविद्यालय परिसर

जळगाव- अभ्यासक्रम महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावे..विद्यार्थ्यांसाठी शुध्द पाण्याची व्यवस्था करण्यात यावी..स्वच्छतागृहात सॅनेटरी पॅड्स टाकण्याची व्यवस्था असावी यासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने शुक्रवारी सकाळी ११ वाजता मू.जे. महाविद्यालयाच्या प्राचार्य कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे, अभाविपच्या शिष्टमंडळाने समस्या मांडण्यापेक्षा त्या प्रत्यक्ष प्राचार्यांना दाखवून विद्यार्थ्यांच्या अडचणी सांगितले. त्यामुळे येत्या आठवडाभरात संघटनेच्या सर्व मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन प्राचार्य डॉ़ उदय कुळकर्णी यांनी दिले आहे.दहा ते पंधरा दिवसांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून मू.जे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत निवेदन देण्यात आले होते. मात्र, महाविद्यालय प्रशासनाकडून निवेदनाची कुठलीही दखल घेतली नसल्यामुळे अखेर शुक्रवारी अभाविपतर्फे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुळकर्णी यांच्या कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन प्रदेशसह मंत्री सिध्देश्वर लटपटे व नगरमंत्री अश्विन सुरवाडे यांच्या नेतृत्वाखाली केले गेले.समस्यांच्याठिकाणी प्राचार्यांची पाहणीअभाविपच्या शिष्टमंडळाकडून प्राचार्य उदय कुळकर्णी यांची भेट घेण्यात आली. समस्यांचे कथन करून कुठलीही दखल घेतली जात नाही. म्हणून शिष्टमंडळाने प्राचार्यांना प्रत्यक्ष ज्याठिकाणी समस्या आहेत. त्याठिकाणी नेले. त्यावेळी शुध्द पाणी नसल्याचे दिसून आले तर महाविद्यालयाच्या वर्ग खोलींजवळ मोकाट  कुत्रे  फिरताना दिसले तर ग्रंथालयातील बंद संगणकही प्राचार्यांना दिसून आले.आठवडाभरात होणार समस्यांचे निरासनप्राचार्य डॉ़ उदय कुळकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या प्रत्यक्ष पाहून अभाविपच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आलेल्या मागण्या आठवडाभरात पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच संघटनेकडून प्राचार्यांची विविध विषयांवर चर्चा करण्यात आली़ तसेच मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देताना प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे,नगर मंत्री अश्विन सुरवाडे, जिल्हा संयोजक रिद्धी वाडिकर, नगर विद्यार्थिनी प्रमुख वर्षा उपाध्ये, महाविद्यालय अध्यक्ष रितेश चौधरी, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय अध्यक्ष मयूर अलकारी, कुणाल कोळी, कृष्णा बारी, अभिषेक पाटील, हेमांगी पाटील, करण माळकर,  मयूर अलकारी, कुणाल बावस्कर आदींची उपस्थिती होती.खुर्ची छोडो आराम करो..अभाविपच्या शिष्टमंडळाने महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळून घोषणाबाजीला सुरूवात केली. प्राचार्य साहेब एक काम करो, खुर्ची छोडो आराम करो...या प्रशासनाचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय या घोषणांनी महाविद्यालय परिसर दणाणून सोडले होते.या आहेत मागण्यामहाविद्यालयाच्या संकेतस्थळावर अभ्यासक्रम अपलोड करावे, ओळखपत्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तक मिळत नसून त्वरित ओळखपत्र द्यावे, विद्यार्थ्यांसाठी शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, महाविद्यालयात मोकाट कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, गं्रथालयातील बंद संगणकांची दुरूस्ती करण्यात यावी, महाविद्यालयात कचरा कुंडी ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा मागण्या अभाविष शिष्टमंडळाकडून करण्यात आली आहे. तर या मागण्या आठवडाभरात पूर्ण करण्याचे आश्वासन मू.जे. महाविद्यालयात प्राचार्यांनी दिले आहे़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव