कायम ग्रामसेवक नसल्याने अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:19 IST2021-08-26T04:19:28+5:302021-08-26T04:19:28+5:30
मनवेल, ता. यावल : येथील ग्रामपंचायतीत ग्रामसेवक प्रभारी असल्यामुळे ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ...

कायम ग्रामसेवक नसल्याने अडचणी
मनवेल, ता. यावल : येथील ग्रामपंचायतीत ग्रामसेवक प्रभारी असल्यामुळे ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथे कायमस्वरूपी ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
येथे नियुक्त असलेले ग्रामसेवक चार ग्रामपंचायतींचा पदभार पाहात आहेत. यामुळे ग्रामपंचायतीला पूर्ण वेळ देता येत नाही. परिणामी, नागरिकांना गावात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
येथे नियुक्त ग्रामसेवक हेेमंत जोशी हे साकळी ग्रामपंचायतीचा पदभार पाहतात. त्यांच्या रिक्त जागी भरत पाटील यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला असून, ते चार गावाचा पदभार सांभाळत आहेत.
तालुक्यात ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचा बदल्या झाल्या आहेत. अनेक ठिकाणी जागा रिक्त आहे.
मनवेल येथील ग्रामपंचायतला कायमस्वरूपी ग्रामसेवक नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.