आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 04:59 PM2020-11-08T16:59:44+5:302020-11-08T16:59:49+5:30

मंत्री के. सी. पाडवी  यांचे आश्वासन 

The problems of the ashram school staff will be solved with priority | आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार 

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार 

Next

मुक्ताईनगर :  आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटना जिल्हा जळगाव तर्फे आदिवासी विकास मंत्री  ॲड .के. सी. पाडवी यांना शिक्षक व शिक्षकेतर बांधवांच्या समस्यांबाबत संघटनेचे  जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले .सोबत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पाडवी यांनी प्रश्न  प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले.
शासकीय व अनुदानित संघटनेतर्फे  निवेदन दिले. खडसे यांच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री उशिरा भेट घेतली.  त्यांच्या मागण्यापूर्ण करणेबाबत शमाजी मंत्री एकनाथ खडसे  व आमदार शिरिष चाैधरी यांनी आग्रही भूमिका मांडली.  याबाबत आपण लवकरच मंत्रालयात बैठकीचे आयोजन करणार असल्याचे मंत्री के. सी. पाडवी यांनी            सांगितले.
निवेदन देताना शासकीय जिल्हाध्यक्ष प्रशांत बोदळे ,  प्रभाकर पाटील, नंदलाल पाटील, साईदास पवार विभागीय सदस्य जितेंद्र पाटील उपाध्यक्ष,  चंद्रकांत पाटील कार्याध्यक्ष,  मनोज ठाकरे सचिव,  कमलेश चौधरी तालुकाध्यक्ष भडगाव, चारुलता जावळे , माधुरी पाटील महिला आघाडी सदस्य,  सुभाष पाटील,  राहुल चौधरी,  महाजन , निळकंठ बाविस्कर, संजय इंगळे,  आदी उपस्थित होते.
 

Web Title: The problems of the ashram school staff will be solved with priority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.