पुरस्कार रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:50 IST2021-01-08T04:50:12+5:302021-01-08T04:50:12+5:30

वसुली वाढली जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीमुळे विविध कर वसुलीत वाढ झाली असून लवकरच याची संपूर्ण माहिती ग्रामपंचायत विभागाला प्राप्त ...

Prizes stalled | पुरस्कार रखडले

पुरस्कार रखडले

वसुली वाढली

जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीमुळे विविध कर वसुलीत वाढ झाली असून लवकरच याची संपूर्ण माहिती ग्रामपंचायत विभागाला प्राप्त होणार आहे. कर भरणे बंधनकारक असल्याने उमेदवारांनी कर भरणा केल्यामुळे यंदा वसुलीत वाढ झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सभांना मुहूर्त

जळगाव : जिल्हा परिषदेच्या तहकूब सभांना अखेर मुहूर्त मिळाला असून स्थायी समितीची २० जानेवारी तर सर्वसाधारण सभा ही २२ जानेवारीला जिल्हा परिषदेच्या सभागृहात होणार आहे. याबाबत नुकताच निर्णय घेण्यात आला आहे.

बाहेरील एक रुग्ण

जळगाव : जिल्ह्यात गुरूवारी बाहेरील जिल्ह्यातील एका रुग्णाची नोंद झाली आहे. तर एका रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. बाहेरील जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या १० वर पोहोचली आहे.

रस्त्याचे तीन तेरा

जळगाव : अयोध्यानगरातील मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याची साधी दुरूस्तीही होत नसल्यामुळे वाहनधारकांमधून संतप्त प्रतिक्रया उमटत आहेत. रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यांवरून अक्षरक्ष: कसरत करीत जावे लागत आहे.

Web Title: Prizes stalled