पोलीस कराटे व स्केटिंग क्लबमध्ये पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:18 IST2021-02-11T04:18:45+5:302021-02-11T04:18:45+5:30

जळगाव : वेट्रेन्स इंडिया स्पोर्ट्स महाराष्ट्र चॅप्टरने आयोजित केलेल्या फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत पोलीस कराटे व स्केटिंग क्लब ...

Prize distribution at Police Karate and Skating Club | पोलीस कराटे व स्केटिंग क्लबमध्ये पारितोषिक वितरण

पोलीस कराटे व स्केटिंग क्लबमध्ये पारितोषिक वितरण

जळगाव : वेट्रेन्स इंडिया स्पोर्ट्स महाराष्ट्र चॅप्टरने आयोजित केलेल्या फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत पोलीस कराटे व स्केटिंग क्लब मध्ये एकूण १२० खेळाडूंनी व पालकांनी त्यात सहभाग नोंदवला होता. त्या स्पर्धचे पारितोषिक वितरण पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ.सई नेमाडे, परेश सनांसे, पोलीस अधीक्षक यांच्या पत्नी डॉ.अमृता मुंडे, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे ,मानव संसाधन विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे उपस्थित होते. या वेळी कराटे व स्केटींग चे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मानव संसाधन विभाग व कराटे व स्केटिंग क्लबचे प्रशिक्षक यांनी केले. प्रास्ताविक अश्विनी निकम तर आभार जागृती काळे यांनी मानले. जिल्हा वेटरन इंडियाचे सचिव राहुल वाघ उपस्थित होते.

विजय स्पर्धक खलील प्रमाणे

(प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे)

गृप पहिला -

मुले - शान तडवी, मानस काळे, अंशुल खेळवाळे, मुली - मृणाल देशमुख, पारुल पाटील, स्वरा चौधरी

दुसरा गृप मुले - आर्यन पाटील, पूर्वेश विधाते, कौस्तुभ जंजाळे, मुली - पूर्वा पाटील, छवी शिंपी, समृद्धी परदेशी

तिसरा गृप मुले - चारुदत्त शिरसाठ, सात्त्विक पाटील, श्रेयससिंग परदेशी. तिसरा 2 ग्रुप मुले - कुणाल शिरसाठ, पार्थ कुंटे, प्रथमेश पाटील.

तिसरा गृप मुली - चैताली पाटील मानसी चौधरी, स्पर्शज्या नेमाडे

चौथा गृप मुले - साहिल तडवी, स्मित मिश्रा, स्वप्निल पाटील, मुली - प्रियांका साळी, हंसिका डहाके, मानसी बडगुजर, चौथा ग्रुप २ मुले - चारुदत्त शिरसाठ,सात्त्विक पाटील, श्रेयससिंग परदेशी

पाचवा ग्रुप मुले - कार्तिक शिरसाठ मुली - कोटीज्या नेमाडे, कांचन कल्याणकर,

पाचवा ग्रुपा २ मुले - पंकज चौधरी, मयूर शिरसाठ, अनिकेत तायडे

खुला ग्रुप मुली - दीक्षा पाटील, मीराबाई कोळी, सुजाता रायसिंग

पालक ग्रुप मुले- सपना काळे, मनीषा पाटील

Web Title: Prize distribution at Police Karate and Skating Club