नातेवाईकांना भेटू न दिल्याने कैद्याने मारली स्वत:च्या डोक्यात हातकडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:16 IST2021-03-06T04:16:21+5:302021-03-06T04:16:21+5:30

जळगाव : नातेवाईकांना भेटू न दिल्याचा राग आल्याने महेंद्र अशोक महाजन (२७) या कैद्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ...

The prisoner hit himself on the head with a handcuff for not allowing his relatives to meet him | नातेवाईकांना भेटू न दिल्याने कैद्याने मारली स्वत:च्या डोक्यात हातकडी

नातेवाईकांना भेटू न दिल्याने कैद्याने मारली स्वत:च्या डोक्यात हातकडी

जळगाव : नातेवाईकांना भेटू न दिल्याचा राग आल्याने महेंद्र अशोक महाजन (२७) या कैद्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आपल्या हातातील हातकडी डोक्यात मारून घेत स्वत:ला जखमी केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात नोंद घेण्यात आली आहे.

खुनाच्या प्रकणात संशयित महेंद्र महाजन हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. महेंद्रच्या पोटात दुखत असल्याने त्याला शुक्रवारी उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यावेळी महेंद्रने नातेवाईकांना भेटण्याचा आग्रह धरला. परंतु,पोलिसांनी त्यास भेटण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे संतापाच्या भरात महेंद्रने त्याच्या हातात घातलेली लोखंडाची हातकडी स्वत:च्या डोक्यात मारुन घेतली. त्याच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याने तो रक्तबंबाळ झाला होता.

रुग्णालयात उपचार

डोक्याला जखम झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महेंद्रवर तात्काळ उपचार करीत त्याला पोलीस बंदोबस्तात रुग्णालयातील कैदी वाॅर्डात दाखल केले. या प्रकाराची पोलिसात नोंद घेण्यात आली असून महेंद्र महाजन याच्यासाेबत आणखी एकाला उपचारार्थ रुग्णालयात आणण्यात आले होते.

Web Title: The prisoner hit himself on the head with a handcuff for not allowing his relatives to meet him