भुसावळ न्यायालय आवारातून कैदी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 21:21 IST2019-08-02T21:21:31+5:302019-08-02T21:21:35+5:30

शौचालयाच्या खिडकीतून काढला पळ

Prisoner escapes from Bhusawal court premises | भुसावळ न्यायालय आवारातून कैदी फरार

भुसावळ न्यायालय आवारातून कैदी फरार


भुसावळ - जळगाव कारागृहातून भुसावळ येथे न्यायालयात सुनावणीसाठी आणलेल्या दोन कैद्यांपैकी एकाने शौचालयाच्या खिडकीची लोखंडी ग्रील तोडून पळ काढल्याची घटना शुक्रवारी २ रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे न्यायालय परिसरात पोलिसांची तारांबळ उडाली होती.
भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील जळगाव कारागृहात बंदिस्त आसीफ बेग असलम बेग (बाबा काल्या ) व कलीम शेख या दोघांना दुपारी भुसावळ न्यायालयात आणले होते. दीड वाजेच्या सुमारास कलीम शेख हा जेवणास बसला. यावेळी ३ पोलीस त्याच्यासोबत होते. तर बाबा काल्या या आरोपीने शौचास जाण्याचा बहाणा केला. बराच वेळ झाल्यावरही बाबा काल्या बाहेर न आल्यामुळे त्यांनी बघितले असता बाबा काल्या हा खिडकीतून पसार झाला होता. बाबा काल्या विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद नव्हती.

Web Title: Prisoner escapes from Bhusawal court premises