आमदार निधीतील प्रिंटरचा शाळेसाठीच वापर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST2021-06-19T04:11:38+5:302021-06-19T04:11:38+5:30
आमदारांच्या निधीतून शाळांना मिळालेले अनेक संगणक गायब झाल्याची खंत लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : शाळांच्या मुख्याध्यापक आणि लिपिकांनी आमदार ...

आमदार निधीतील प्रिंटरचा शाळेसाठीच वापर करावा
आमदारांच्या निधीतून शाळांना मिळालेले अनेक संगणक गायब झाल्याची खंत
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : शाळांच्या मुख्याध्यापक आणि लिपिकांनी आमदार निधीतून मिळालेल्या प्रिंटरचा वापर शालेय कामकाजासाठीच करावा, असे आवाहन माध्यमिक पतपेढीचे माजी अध्यक्ष तथा शिक्षक नेते संभाजी पाटील यांनी केले.
खान्देश शिक्षण मंडळाच्या रोटरी हॉलमध्ये झालेल्या शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या स्थानिक विकास निधीतून अमळनेर व पारोळा तालुक्यातील ४४ शाळांना संगणक प्रिंटर वितरणप्रसंगी ते बोलत होते.
शाळांना मिळालेले संगणक अनेक ठिकाणी गायब झालेले दिसून येतात. शिक्षणासाठी त्याचा वापर होत नाही, अशी खंत व्यक्त करून संभाजी पाटील म्हणाले की, शिक्षक आमदारांचा स्थानिक विकास निधी हा शिक्षणासाठीच खर्च व्हावा म्हणून आमदार दराडे यांनी पुस्तके आणि प्रिंटर वाटप केले आहेत. नाशिक मतदार संघातील एकही शाळा वंचित राहणार नाही, असे आश्वासनदेखील संभाजी पाटील यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील भदाणे यांनी केले.
यावेळी आमदारांचे स्वीय सचिव हरिष मुंढे, माध्यमिक पतपेढी संचालक नंदकुमार पाटील, पी. डी. पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, टी. डी. एफ. तालुकाध्यक्ष सुशील भदाणे सानेगुरुजी, पतपेढीचे चेअरमन के. यु. बागुल, संचालक तुषार पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, मुख्याध्यापिका जे. के. सोनवणे, उपमुख्याध्यापक डी. एच. ठाकुर, शिक्षक भारतीचे जिल्हा कार्याध्यक्ष आर. जे. पाटील, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष एम. ए. पाटील, भास्कर चौधरी, कलाध्यापक संघाचे आर. डी. चौधरी हजर होते. शिवसेना तालुकाप्रमुख विजय पाटील, शहरप्रमुख संजय कौतिक पाटील, शिक्षक सेनेचे संदीप पाटील हजर होते.