यावलमध्ये सट्ट्यावर छापा,दोघांविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:22 IST2018-08-11T00:18:19+5:302018-08-11T00:22:13+5:30

यावल शहरातील बाबुजीपूरा आणि खिडकीपुरा या भागात पोलिसांनी सट्टा जुगारावर छापा टाकून दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Print this on Yale, crime against both | यावलमध्ये सट्ट्यावर छापा,दोघांविरूद्ध गुन्हा

यावलमध्ये सट्ट्यावर छापा,दोघांविरूद्ध गुन्हा

ठळक मुद्देरोकडसह जुगाराची साधने जप्तदोन ठिकाणी केली कारवाई


यावल जि. जळगाव : शहरातील बाबुजीपुरा येथील सट्टा जुगारावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी तर खिडकीपुरा भागातील सट्टा व्यवसायावरही स्थानिक पोलिसांनी छापा टाकून एक हजार ५४० रुपयांच्या रोकडसह सट्टा जुगाराची साधने जप्त केल्याची कारवाई शुक्रवारी करण्यात आली.
पोलीस सूत्रानुसार, पहिल्या कारवाईत बाबुुजीपुरा भागात सार्वजनिक ठिकाणी संशयीत आरोपी सय्यद असलम स. बाबु याच्याकडून पोलिसांनी एक हजार दोनशे रुपयांची रोकड व सट्टा जुगाराची साधने जप्त केली. या बाबतची फिर्याद पो. कॉ. मनोज दुसाने यांनी दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तर खिडकीपुरात भागात संशयीत आरोपी जुम्मा दिलदार तडवी रा. वड्री याच्याकडून ३०० रुपयांची रोकड व सट्टा जगाराची साधने स्थानिक पोलिसांनी कारवाई करीत जप्त केली आहे.
दोन्ही संशयीत आरोपींविरूध्द मुं.पो. अ‍ॅक्ट १२ अ प्रमाणे कारवाई करण्यात आली असून हे. कॉ. रा. का. पाटील पुढील तपास करीत आहेत.

 

Web Title:  Print this on Yale, crime against both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.