शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

चाळीसगाव तालुक्यातील करजगाव येथे बनावट दारूच्या कारखान्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 18:30 IST

चाळीसगाव तालुक्यातील करजगाव येथे बनावट देशी दारू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा घालत डीवायएसपी नजीर शेख यांच्या पथकाने दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. अन्य दोघे फरार झाले.

ठळक मुद्देदोन लाखाचा मुद्देमाल हस्तगतदोघे फरारदोघांना दोन दिवस पोलीस कोठडी

चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील करजगाव येथे बनावट देशी दारू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा घालत डीवायएसपी नजीर शेख यांच्या पथकाने दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. अन्य दोघे फरार झाले. सोमवारी पहाटे दीड वाजता ही कारवाई करण्यात आली. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, अवैद्य धंद्यांनी डोके वर काढल्याने शहराची प्रतिमा मलिन होत असल्याचा सूर उमटला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कारवाई झाल्याने हे प्रकरण चांगलेच तापणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.करजगाव येथे मराठी शाळेच्या मागे मनोज शरद साबळे (वय ३५) याच्या शेतात एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट दारू तयार केली जात असल्याची खबर पोलिसांनी मिळाली. यानुसार सोमवारी पहाटे दीड वाजता डीवायएसपी नजीर शेख यांच्यासह राजेश दावणे, अमोल कुमावत, गोवर्धन बोरसे, हिरामण तायडे, महेंद्र साळुंखे यांच्या पथकाने येथे छापा घातला. यावेळी येथे मनोज साबळे व विनोद जिभाऊ पवार (वय ३०) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. मनोज राजपूत, मनोज मांडगे (दोन्ही रा.चाळीसगाव) हे मात्र येथून पसार झाले. चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.कारवाईत मद्याच्या बाटल्या, दारु बनविण्यासाठीचे अल्कोहोल, बुच लावण्याचे मशीन असा एकूण दोन लाख सहा हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.प्राप्त माहितीनुसार, मनोज साबळे याने जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. त्याचे इतर राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत असणारे छायाचित्रे दिवसभर सोशल मिडियावर व्हायरल होत होते. गेल्या काही दिवसात गांजा तस्करी, वाळू माफियांची मुजोरी याबरोबरच अवैद्य शस्त्रांचाही वापर होत असल्याने शहरात गुन्हेगारी वाढल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी आपला खाक्या दाखवावा, अशी अपेक्षाही होत आहे.सोमवारी दोघा आरोपींना न्यायालयात उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास फौजदार जगदीश मुलगीर करीत आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीChalisgaonचाळीसगाव