प्राचार्य मुळे यांचे झोपेतच निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2017 00:36 IST2017-01-15T00:36:22+5:302017-01-15T00:36:22+5:30

जळगाव : काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुहास प्रभाकर मुळे (वय 57) यांचे शनिवारी पहाटे झोपेतच निधन झाले

Principal Rowdy died in sleep | प्राचार्य मुळे यांचे झोपेतच निधन

प्राचार्य मुळे यांचे झोपेतच निधन


जळगाव : काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुहास प्रभाकर मुळे (वय 57) यांचे शनिवारी पहाटे झोपेतच निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
प्राचार्य मुळे हे जबलपूरचे मुळ रहिवाशी होते. त्यांनी चेन्नई येथील ओमेगा इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य म्हणून सात वर्षे काम पाहिले आणि गेल्या तीन वर्षापासून ते पलोड स्कूलमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत होते. भौतिकशास्त्र विषयात अत्यंत तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती.

दीड वाजता झोपले आणि परत उठलेच नाही
प्राचार्य मुळे हे आजारी होते. शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता ते लघुशंकेसाठी उठले होते. त्यानंतर ते झोपले असता पहाटे त्यांच्या घोरण्याचा आवाज येत नसल्याने त्यांच्या पत्नीने शेजारच्या मंडळींना व त्यानंतर डॉक्टरांना बोलविले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या या अचानक निधनामुळे त्यांच्या कुटुंबासह सर्वानाच धक्का बसला.

Web Title: Principal Rowdy died in sleep