शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

राज्यातील प्राथमिक शिक्षकांना अधिवेशन विशेष रजा नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 11:23 IST

उन्हाळी सुटीमध्ये अधिवेशन घेण्याची ग्रामविकास विभागाने शिक्षक समितीला केली सूचना

ठळक मुद्देग्रामविकास विभागाचा सुटींवर अंकूश लावण्याचा प्रयत्नशिक्षकांचे अधिवेशन उन्हाळी सुटीमध्येच घेण्याच्या सूचनाविशेष रजा मिळणार नसल्याने गुरुजींमध्ये नाराजी

आॅनलाईन लोकमतगोंडगाव, ता भडगाव,दि.६ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीच्या वतीने शिक्षकांचे राज्यस्तरीय अधिवेशन किंवा शिक्षण परिषद घेण्यासाठी शिक्षकांना विशेष रजा मंजूर करण्याबाबतचे पत्र ग्रामविकास विभागाला दिले होते. मात्र ग्रामविकास विभागाने विशेष रजा नाकारून उन्हाळी सुटीमध्ये हे अधिवेशन घेण्याच्या सूचना शिक्षक समितीला दिल्या असल्याचे समजते. त्यामुळे शैक्षणिक सत्रामध्ये शिक्षकांना विशेष रजेच्या निमित्याने मिळणारी सुटी दुरापास्त झाली आहे.राज्यात प्राथमिक शिक्षकांच्या वेगवेगळ्या संघटना कार्यरत आहेत. दिवाळीनंतर दुसरे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर या संघटनांना वेध लागतात, ते शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे. या अधिवेशनाच्या निमित्याने सात दिवसांच्या विशेष रजा शासनाकडून मंजूर करून घेतल्या जात होत्या. यापूर्वी शासन तशा रजा शिक्षक संघटनांना देत असे. मात्र आता ग्रामविकास विभागाने त्यावर अंकूश लावण्याचा प्रयत्न केला आहे. दुसºया शैक्षणिक सत्रामध्ये अधिवेशन किंवा शिक्षण परिषद घेतल्यास आठ दिवस विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी शैक्षणिक सत्राच्या कालावधीत अधिवेशन घेता येणार नाही, असे ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षक समितीच्या राजाध्यक्षांना दिलेल्या पत्राद्वारे सांगितले आहे. शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करायची असेल, दिशा ठरवायची असेल तर शिक्षकांचे अधिवेशन प्रदीर्घ असलेल्या उन्हाळी सुटीमध्येच घेण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने केल्या आहेत. त्याबाबतचे पत्र प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्याध्यक्षांना २३ नोव्हेंबर रोजी दिले आहे. शिक्षण विभाग व ग्रामविकासाच्या मदतीने उन्हाळी सुटीमध्ये हे अधिवेशन घेण्यासही त्यांनी सांगितले आहे.शिक्षकांमध्ये तीव्र नाराजीअधिवेशनाच्या निमित्ताने विशेष रजा घेऊन वैयक्तिक कामे करण्याºया गुरुजींना ग्रामविकासाच्या या निर्णयाने धक्का बसला आहे. विशेष रजा मिळणार नसल्याने गुरुजींमध्ये नाराजी पसरली आहे. मुलांचा गुणवत्तेचा विचार करता शासनाने हा निर्णय घेण्यात आला आहे. हे अधिवेशन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.दरम्यान, याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी याविषयी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

 अधिवेशन काळात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, ज्ञानरचनावाद तसेच शैक्षणिक समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी अधिवेशन होत असते. ग्रामविकास विभागाने स्पष्टपणे नकार द्यायला नको होता. शिक्षकाने जी रजा भोगली त्याचा अभ्यासक्रम तो पूर्ण करतोच. त्यासाठी मी स्वत: प्रयत्नशील असून, पुन्हा ग्रामविकास विभागाला पत्र पाठविणार आहे.-विलास यादवराव नेरकरजिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघटना, जळगाव

टॅग्स :Teacherशिक्षकJalgaonजळगावGovernmentसरकार