चाळीसगावला आणीबाणीतील बंदिवानांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST2021-06-26T04:13:19+5:302021-06-26T04:13:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगावः आणीबाणीच्या स्मृतिदिनी शुक्रवारी बंदिवानांचा भाजप युवा मोर्चाच्यावतीने गौरव करण्यात आला. या बंदिवानांपैकी हयात असणाऱ्या ...

Pride of emergency prisoners in Chalisgaon | चाळीसगावला आणीबाणीतील बंदिवानांचा गौरव

चाळीसगावला आणीबाणीतील बंदिवानांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगावः आणीबाणीच्या स्मृतिदिनी शुक्रवारी बंदिवानांचा भाजप युवा मोर्चाच्यावतीने गौरव करण्यात आला. या बंदिवानांपैकी हयात असणाऱ्या चार जणांसह उर्वरित बंदिवानांच्या कुटुंबीयांना आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते गौरविण्यात आले. प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन हा सन्मान करण्यात आला.

२५ जून १९७५ रोजी देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लावली !.... या आणीबाणीखाली शेकडो राजकीय नेत्यांना अटकेत जावं लागलं... ही एक प्रकारची लोकशाहीची हत्याच होती.

चाळीसगाव तालुक्यातील आणीबाणीत तुरुंगात जाणाऱ्या १३, तर सत्याग्रही म्हणून काम करणाऱ्या १४ जणांचा सहभाग होता. हयात असलेल्या चार व बाकी बंदिवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी वसंतराव चंद्रात्रे, किसान मोर्चा राज्य उपाध्यक्ष पोपट भोळे, भाजयुमो राज्य उपाध्यक्ष कपिल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, यु. डी. माळी सर, ॲड. प्रशांत पालवे, सुनील पवार, शहराध्यक्ष भावेश कोठावदे, गिरीश बऱ्हाटे, अमोल चव्हाण, योगेश खंडेलवाल शिवदास महाजन, भास्कर पाटील, फकिरा मिर्झा, प्रा. सचिन दायमा यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Pride of emergency prisoners in Chalisgaon