चाळीसगाव तालुका शिक्षक विकास मंचतर्फे गौरव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:20 IST2021-09-15T04:20:14+5:302021-09-15T04:20:14+5:30
यावेळी २०२१ मध्ये सेवानिवृत्त झालेले, पदोन्नती मिळालेले तसेच उल्लेखनीय कार्य असलेल्या शिक्षक, आरोग्यसेवक, डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी यांचा स्मृतिचिन्ह देऊन ...

चाळीसगाव तालुका शिक्षक विकास मंचतर्फे गौरव सोहळा
यावेळी २०२१ मध्ये सेवानिवृत्त झालेले, पदोन्नती मिळालेले तसेच उल्लेखनीय कार्य असलेल्या शिक्षक, आरोग्यसेवक, डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी यांचा स्मृतिचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी ग. स.चे माजी चेअरमन रमेश निकम होते. प्रमुख अतिथी म्हणून जळगाव येथील ग.स. सहकारचे अध्यक्ष उदय पाटील, गटशिक्षणाधिकारी विलास भोई, व्ही. झेड. पाटील, अजबसिंग पाटील, भानुदास पवार, कल्पना पाटील, प्राचार्य तानसेन जगताप, डॉ. मंदार करंबळेकर, नगरसेविका सविता राजपूत, दिलीप पाटील, आर. के. माळी, देवेंद्र पाटील, मंगेश भोईटे, महेश पाटील, मनोज पाटील, डॉ. अनुराधा खैरनार, किशोर चव्हाण, अनिल पाटील, मनीष शिंदे, राजेंद्र पाटील, जीवन टील, एम. बी. पाटील, आर. डी. चौधरी, अशोक परदेशी, राजेश पवार, अजित पाटील आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक अजित पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दीपक पाटील व रवींद्र बेलदार यांनी, तर आभार अजिज खाटीक यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेश पवार, दीपक पाटील, कोमल जाधव, हिलाल पाटील, लक्ष्मण चव्हाण, भय्यासाहेब वाघ, आर. डी. पाटील, शरद मोरे, विजय पवार, सदाशिव पाटील, पंढरीनाथ पवार, सतीश राजपूत, दिलीप देशमुख, दिगंबर राजपूत, श्रीकृष्ण अहिरे, राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वर देवरे, वाल्मीक निकम, शालिग्राम पाटील, अनिल सूर्यवंशी, माधवराव पाटील, रवींद्र बेलदार, अजिज खाटीक, सचिन वाघ, सुकदेव राठोड, संजय राजपूत, जाविद रंगरेज, रमेश पाटील, गुलाबराव पाटील, सुनील देवरे यांनी घेतले.
अध्यक्षीय भाषणात रमेश निकम यांनी चाळीसगाव तालुका शिक्षक विकास मंचच्या या उपक्रमाचा गौरव करताना सांगितले की, आयुष्यभर लोकसेवक प्रामाणिक कार्य करत राहतात, त्यांचा सत्कार व सन्मान होत नाही; परंतु आपण तो केला म्हणून त्यांनी आयोजकांना त्यांनी धन्यवाद दिले.
फोटो मॅटर
चाळीसगाव येथे शिक्षक विकास मंचतर्फे करण्यात आलेले सत्कारार्थी व प्रमुख अतिथी.