शहरं
Join us  
Trending Stories
1
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
2
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
3
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
4
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
5
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
6
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
7
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
8
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
9
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
10
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
11
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
12
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
13
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
14
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
15
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
16
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
17
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
18
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
19
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
20
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
Daily Top 2Weekly Top 5

भाज्यांची आवक वाढल्याने भाव गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 12:35 IST

मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी मात्र हैराण

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढून जवळपास सर्वच भाज्यांचे भाव कमी झाले असून यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये केवळ वांग्यांना मागणी वाढल्याने त्यांचे भाव महिनाभराच्या तुलनेत ५०० रुपये प्रती क्विंटलने वाढून ते १००० ते २१०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहे. दुसरीकडे मात्र कांदा, भेंडी, कारले, कोथिंबीर, टमाटे यांचे भावदेखील कमी झाले आहे.सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यातील विविध भागांसह शेजारील औरंगाबाद व धुळे जिल्ह्यातूनही भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाज्यांचे दर कमी होण्यास मदत होत आहे.कोथिंबीरच्या भावात घसरणमध्यंतरी कोथिंबीरचे भाव वाढून ती २५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली होती. मात्र हळूहळू आवक वाढत गेली व या आठवड्यात तर कोथिंबीरचे भाव केवळ ५०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहे. अशाच प्रकारे बटाट्याची आवक ३०० क्विंटलवर पोहचली असून त्याचे भाव निम्याने कमी होऊन ते ३७५ ते ६२५ रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत.मेथी भाजी १० रुपयांवरहिवाळी वातावरणात हिरवा पालेभाजा खाण्यास मोठी पसंती दिली जाते. त्यामुळे या दिवसात मेथी, पोकळा, शेपू-पालक, आंबडचुका यांना मागणी वाढते. त्यामुळे त्यांचे भावदेखील वाढू लागतात. मात्र यंदा या हिरव्या भाज्यांची आवकही वाढल्याने भाव नियंत्रणात राहण्यास मदत होत आहे. त्यामुळे सध्या मेथीची भाजी केवळ १० रुपये प्रती किलोवर आली आहे. या शिवाय पोकळादेखील १० रुपये प्रती किलोवर असून पालक १८ रुपये प्रती किलोवर आला आहे.या शिवाय लाल कांदा २५० ते ६२५ रुपये प्रती क्विंटल, पांढरा कांदा ३७५ ते ७५० रुपये प्रती क्विंटलने विक्री होत आहे. फूलकोबी ८०० ते १२०० रुपये प्रती क्विंटल, पानकोबी ५०० ते ९०० रुपये प्रती क्विंटल असा भाव मिळत आहे.किरकोळ बाजारात दर कमी होण्याची अपेक्षाकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांचे दर कमी आहे. किरकोळ बाजारातही हे दर कमी झाले असले तरी ज्या प्रमाणात कृउबात दर कमी झाले आहे त्या तुलनेत किरकोळ बाजारात अजून भाज्याचे दर कमी होण्याची अपेक्षा ग्राहक व्यक्त करीत आहेत.किरकोळ बाजारातील भाज्यांचे दरकिरोकळ बाजारात कोथिंबीर ५० ते ६० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे. मेथी भाजी ४० ते ५० रुपये, कारले ४० रुपये, पानकोबी - ३० ते ४० रुपये, फूलकोबी - ५० ते ६० रुपये, शेवगा शेंगा ४० ते ५० रुपये, हिरवी मिरची ३० ते ४० रुपये, पोकळा - ३० ते ४० रुपये, कांदा - १० ते १५ रुपये, बटाटे - १५ ते २० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे.शेतकरी हैराणहाती चांगले उत्पादन आल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी समाधानी होत तर आहे, मात्र बाजारात त्याला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने तो हैराण होत आहे. दिवसेंदिवस भाज्यांचे दर कमी-कमी होत असल्याने भाजीपाला उत्पादक मेटाकुटीस आला आहे.

टॅग्स :vegetableभाज्याJalgaonजळगाव