शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या ‘बीटी’ वाणांच्या किंमती निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 18:51 IST

खरीप व रब्बी हंगाम २०२२-२३ व खरीप हंगाम २०२३ ची पूर्व नियोजन आढावा सभा जिल्हा नियोजन भवनात विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

कुंदन पाटील 

जळगाव : खरीप व रब्बी हंगाम २०२२-२३ व खरीप हंगाम २०२३ ची पूर्व नियोजन आढावा सभा जिल्हा नियोजन भवनात विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दरम्यान,खरीप हंगामासाठी कापसाच्या बीजी-१ वाणाची प्रति पाकिट ६३५ तर बीजी-२ वाणाची ८५३ रुपये किंमत निश्चीत करण्यात आली आहे.

या सभेत सन २०२२-२३ खरीप हंगाम व रब्बी हंगामातील बियाणे, रासायनिक खते मागणी व पुरवठयाबाबत सादरीकरण करण्यात आले. खरीप हंगाम २०२२ मध्ये जिल्ह्यात एकुण ७ लाख ४१ हजार ७१६ हेक्टर क्षेत्रावर (९६.२२ टक्के) पेरणी करण्यात आली होती. त्यासाठी ३९ हजार ६७३ क्विंटल बियाणे उपलब्ध करण्यात आले होते.

 खरीप हंगाम २०२३ साठी ७लाख ५६ हजार ६०० हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित असून त्यासाठी सार्वजनिक व खाजगी कंपन्यांमार्फत ३८ हजार ८८१ क्विंटल बियाणे पुरवठयाचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामबिजोत्पादन अंतर्गत १७ हजार क्विंटल सोयाबिन बियाणे शेतकरीस्तरावर उपलब्ध आहे. 

दीड लाख टन खतांचा साठाखरीप हंगाम २०२२ मध्ये २ लाख ६८ हजार ५५० मे.टन खत पुरवठा जिल्ह्यात करण्यात आला होता. खरीप हंगाम २०२३ साठी ३ लाख ५ हजार १४० मे. टन रासायनिक खतांचा साठा मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या १ लाख ५७ हजार ९२ मे.टन खत साठा उपलब्ध आहे.  या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर, अमळनेरचे उपविभागीय कृषि अधिकारी नंदकिशोर नाईनवाड, पाचोऱ्याचे विजय पवार, जि.प.चे मोहिम अधिकारी अरूण तायडे, जिल्हा डिलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शैलेद्र काबरा यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व विक्रेते यावेळी उपस्थित होते.

पावणे सहा लाख पाकिटांची मागणी येत्या खरीप हंगामासाठी बीटी संकरीत कापसाच्या बीजी-१ वाणाची प्रति पाकिट ६३५ तर बीजी-२ वाणाची ८५३ रुपये किंमत निश्चीत करण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२३ अंतर्गत कापूस बियाण्याच्या संभाव्य ५ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रासाठी २५ लाख ५० हजार पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे, अशी माहिती जि.प.चे कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी दिली आहे. निर्धारीत दरापेक्षा जास्त दराने खरेदी करु नये. जादा दराने बियाणे विक्री होत असल्याचे निदर्शनात आल्यास संबंधीत तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे त्वरीत तक्रार करावी, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव